Wednesday, March 4

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!
News

मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!

अमरावती : जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट भागात दरवर्षी दिवाळीनंतर एक अनोखा बाजार भरतो. हा बाजार केवळ खरेदी-विक्रीचं ठिकाण नाही, तर प्रेम, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत मेळा आहे. स्थानिक गोंड आणि आदिवासी समाज या बाजाराला प्रेमानं “घुंगरू बाजार” किंवा “थाट्या बाजार” म्हणून ओळखतात.दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवडी बुधवारी हरिसाल, धारणी, सेमाडोह, कोल्हा आदी भागांमध्ये हा बाजार भरतो. पांढरा सदरा, धोतर, कवड्यांची माळ, आणि डोक्यावर पक्ष्यांच्या पिसांनी सजविलेली पगडी परिधान केलेली गोंड मंडळी ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या नादात नाचत बाजारात फिरतात. बांबूपासून तयार केलेल्या बासऱ्यांचे सूर आणि म्हशीच्या शिंगापासून तयार केलेल्या फुंक्यांचे आवाज संपूर्ण बाजारभर घुमत राहतात. या नादात मिसळलेली रंगीबेरंगी माणसं मेळघाटाच्या संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवतात.या दिवशी लोक वर्षभरातील शेतीमाल विक्रीतून मिळालेल्य...
ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!
News

ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!

तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दशासर परिसर आज दणाणून गेला, कारण हजारो शेतकरी, महिला व युवकांनी माजी आमदार मा. विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरोधात दोन तासांचा ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन केला. “सरकार जागे व्हा!”, “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “कर्जमाफी जाहीर करा!” अशा घोषणांनी औरंगाबाद रोडवर जनआक्रोशाचा लोंढा उसळला.काँग्रेसचा सरकारला इशारामाजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी आंदोलनादरम्यान सांगितले,“शेतकरी आत्महत्येच्या टोकावर आहे. कर्जमाफी ही त्याची मागणी नाही, ती त्याची गरज आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करतं, पण शेतकऱ्याला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही शांत बसणार नाही — काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार!” ते पुढे म्हणाले,“शेतकऱ्यांचा घाम सोन्यासारखा मौल्यवान आहे. जर सरकारने त्यांच्या अश्रूंना किंमत दिली नाही, तर जनता ...
पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?
News

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?देहराडून (उत्तराखंड) : प्रेमाला ना वयाचं बंधन, ना नात्याचं! पण या “प्रेमकहाणी”नं मात्र नात्यांचे सगळे अर्थ बदलून टाकले आहेत. उत्तराखंडातील देहराडूनमध्ये घडलेली ही घटना ऐकून कुणीही थक्क होईल कारण इथे फक्त पत्नीच नव्हे, तर पतीदेखील आपल्या जोडीदाराला सोडून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये गेले आहेत!एका विवाहित महिलेने आपल्या पतीला आणि तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर जे घडलं ते आणखीन धक्कादायक तिच्या पतीलाही दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाताना पाहून लोकांचं डोकं फिरलं. आता प्रश्न एकच मुलांचं काय?महिला आयोगाकडे दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल झाली आहे. पत्नीचं म्हणणं “माझ्या पतीला एका महिलेनं फसवलं!” तर पतीचं म्हणणं “माझ्या पत्नीची दिशाभूल करण्यात आली!” आता नेमका बळी कोण आणि दोषी कोण हे ठरवणं आय...
रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!
Article

रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!

रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!३० सेकंदांच्या छोट्या व्हिडिओंना शॉर्ट्स म्हणतात. तथापि, काही व्हिडिओ २ मिनिटांपर्यंतचे असतात. रील्स हा देखील एक प्रकारचा लघु व्हिडिओ आहे. रील्स बनवण्याची क्रेझ टिकटॉक अॅपपासून सुरू झाली. भारतात टिकटॉकवर बंदी घालताच लोकांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्व प्रकारचे रील्स अपलोड करण्यास सुरुवात केली. मजेदार, माहितीपूर्ण, भावनिक, सर्व प्रकारचे व्हिडिओ रील्सवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणूनच लोक त्याचे व्यसन करत आहेत. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजण या रील्स बनवत आहेत, परंतु मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये त्याची जास्त क्रेझ दिसून येत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड करण्यासाठी  काही जण जीवाची पर्वा न  करता वाटेल त्या प्रकारचे रील्स बनवत आहे.तरुण लोक रीलसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. मध्यप्रदेश मध्ये  एका त...
घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव
Article

घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव

घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तवआज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. काही घटस्फोटातून आहेत व वाटायला लागलं आहे की घटस्फोट हा गुन्हा आहे की यल्गार? खरं तर घटस्फोट व्हायला हवेत. पती पत्नीचं जर एकमेकांशी पटत नसेल तर..... परंतु कधीकधी घटस्फोट हे वेगळ्याच कारणानं होतात. जेव्हा कधीकधी विवाहाचा वापर हा खावटी म्हणून पैसा कमवून ऐषआरामात जीवन जगण्यासाठी केल्या जातो. काही वेळेस विवाह हे खावटी मिळवून ऐषआरामाचं आयुष्य जगण्यासाठी केले जात असल्याचं निदर्शनास येतं. अशाच कारणातून कधीकधी आत्महत्या वा खुनासारखे कृत्य घडून येतात. ज्यातून स्वतः जन्मास घातलेली मुलंही सुटत नाहीत. आज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. कधी शेती पिकली नाही म्हणून. कधी परीक्षेत नापास झाले म्हणून. कधी प्रेमभंग झाला म्हणून तर कधी कोणी कोणाला छळलं म्हणून. परंतु पती पत्नी वितुष्टातून आत्महत्या झालेल्या जास्त करुन कोणी ऐ...
नेमकं चाललंय काय?
Poem

नेमकं चाललंय काय?

नेमक चाललय कायहेच हल्ली कळत नाही..कुणीच कुणाला समजून घेतानाअजिबात दिसत नाहीं...नात्याची वीण हल्लीसैल होत चाललीयमाणुसकी तर गेलीनात्याची ओल देखीलपटकण सुखत चाललीय...मनस्ताप होतो माणसाला यातूनबिचारा करणाऱ तरी काय...?तो ही देतो स्वतःलाकाळाच्या उदरात झोकून...काळ तरी कुठे न्याय देतोतो ही माणसाची जणू मजाच घेतो...आज ना उद्या व्यवस्थित होईलह्या एकाच आशेवर तो हि आहे टिकून.............. तो हि आहे टिकून...-अशोक  किसन पवारगटेवाडी ता.पारनेर अहिल्यानगर● हे वाचा –आमची लक्ष्मी.!...
तीन वेळचे आमदार शेअर ऑटोमध्ये: वामनराव चटप यांचा साधेपणाचा धडा!
Story

तीन वेळचे आमदार शेअर ऑटोमध्ये: वामनराव चटप यांचा साधेपणाचा धडा!

काल रात्री मी वर्ध्याहून ट्रेनने बडनेरा स्टेशनला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेर ऑटो रिक्षाची वाट बघत उभा होतो. तेवढ्यात, एक रिक्षावाले एका सीनियर सिटीझनशी बोलताना दिसले. ते सीनियर सिटीझन म्हणाले, "मला चपराशीपुऱ्याजवळ सोडा." रिक्षावाले म्हणाले, "सौ रूपये होंगे!" ते सीनियर सिटीझन म्हणाले, "सौ रूपये आपको पुरता नही!" त्या ड्रायव्हरला ती गंमत वाटली.त्याने त्यांना निग्लेक्ट केलं. मग दुसरा ऑटावाला धावत आला. तो म्हणाला, "वो अंकल कहरे, देडसो दुगा!" त्या दोघांनाही ते गंमत वाटत होती; पण मला वाटले की ती गंमत नाही. मग, हळूहळू मी निरीक्षण केलं तर त्यांच्या छातीवर 'शेतकरी संघटना' 'स्वतंत्र विदर्भ राज्य' असे दोन बिल्ले मला दिसले. ते मला म्हणाले, "त्याला शंभर रुपयांत परवडणार नाही." मग मी त्यांना म्हणालो की, रिक्षावाल्यांना ही गंमत वाटते आहे! ते म्हणाले नाही, मला जायचं आहे ते ठिकाण आतमध्ये आहे. रिक्षावाल्या...
जगातील सर्वात स्वस्त हॉटेल फक्त 20 रुपयांत मुक्काम!
News

जगातील सर्वात स्वस्त हॉटेल फक्त 20 रुपयांत मुक्काम!

प्रवासासाठी किंवा कामानिमित्त अनेकजण वेगवेगळ्या शहरांत मुक्काम करतात. मात्र हॉटेलचं वाढतं भाडं अनेकदा खिशाला चटका लावतं. पण जर तुम्हाला सांगितलं की जगात असं एक हॉटेल आहे जिथे केवळ २० रुपयांत एक रात्र मुक्काम करता येतो तर? होय! पाकिस्तानमधील पेशावर शहरात असलेलं हे अनोखं हॉटेल सध्या जगभर चर्चेत आहे.या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी फक्त ७० पाकिस्तानी रुपये, म्हणजेच अंदाजे २० भारतीय रुपये आकारले जातात. एवढ्या कमी दरात कोणत्या सुविधा मिळतात हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.या हॉटेलच्या खास सुविधा या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी एक खाट, स्वच्छ चादर, पंखा, कॉमन बाथरूम आणि मोफत चहा या सुविधा दिल्या जातात. मात्र येथे खोली नसून झोपण्यासाठी इमारतीच्या छतावर जागा दिली जाते. म्हणजेच प्रवासी आकाशातील तारे पाहत झोपतात एक वेगळाच अनुभव!हे हॉटेल पारंपरिक पश्तून वास्तुकलेने बांधलेलं आहे आणि ते विटा व दगडांनी बन...
दही रोज खा, आरोग्यदायी रहा! जाणून घ्या दह्याचे अनोखे फायदे!
Gerenal

दही रोज खा, आरोग्यदायी रहा! जाणून घ्या दह्याचे अनोखे फायदे!

दही हे भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जेवणात दह्याला नेहमीच स्थान असतं. केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे, तर आरोग्यासाठीही दही अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळेच दह्याला सुपरफूड म्हटलं जातं. दह्यात प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले जिवाणू असतात, जे आपल्या पचनसंस्थेला निरोगी ठेवतात. याशिवाय कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२ आणि पोटॅशिअम या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेले दही शरीराला उर्जा देतं, हाडे मजबूत करतं आणि एकूण आरोग्य सुधारतं.रोज दही खाल्ल्यास अनेक प्रकारे शरीराला फायदा होतो. सर्वात आधी, दह्याचे सेवन हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात असलेले पोषक घटक शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर दह्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय...
अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?
News

अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि भेटवस्तूंचा उत्सव. पण यंदा सोशल मीडियावर मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून वाद पेटला आहे.अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचा डबा आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम दिल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एका कंटेंट क्रिएटरने जुहू येथील ‘जलसा’ बंगल्या बाहेर हा व्हिडिओ शूट केला असून, कर्मचाऱ्यांपैकी एकाने स्वतः ही माहिती दिली आहे.हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बिग बींवर टीकेची झोड उठवली आहे. “बिग बींची संपत्ती जशी प्रचंड, तशी भेट मात्र ‘मिनिमल’ का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. एका युजरने लिहिलं, “ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभर त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना फक्त 10 हजार? लाजिरवाणं आहे हे!”तर काहींनी बच्चन यांच्या बाजूनेही मत मांडलं. “भेट किती दिली हे न...