Sunday, March 8

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
जिमनंतरचं अंडं ठरलं जीवघेणं! फिटनेसप्रेमी संदीपच्या अचानक निधनाने खळबळ!
News

जिमनंतरचं अंडं ठरलं जीवघेणं! फिटनेसप्रेमी संदीपच्या अचानक निधनाने खळबळ!

इंदूर : नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवन आणि आरोग्याबद्दल जागरूकता हे सर्व असूनही एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने इंदूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खातीपुरा परिसरातील 32 वर्षीय संदीप या तरुणाचा जिममधून परत आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.मंगळवारी संध्याकाळी संदीप नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने अंडा हाफ फ्राय खाल्लं. त्यानंतर काही क्षणांतच त्याला छातीत दुखायला लागलं, जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आहे.संदीप गेल्या सहा वर्षांपासून नियमित व्यायाम करत होता. फिटनेस आणि आहाराबाबत तो अत्यंत शिस्तप्रिय होता. त्याचा अकाली मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरल...
घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!
Article

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!

घरापासून स्मशानभुमीपर्यंत.!          आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हे लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुर सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं.         पुर्वीच्या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं होती. पहिलं कारण होतं रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. पुर्वी गावात साथीचे रोग यायचे. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असत. तद्नंतर काळ बदलला व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागला व मरणयोग कमी झाला. दुसरं कारण होतं, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहायचे. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नसायचा व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी...
हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!
Editorial

हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!

हेळवी; आपल्या वंशाची जिवंत परंपरा!आपल्यापैकी बरेचजण आपल्या आजोबांपर्यंतचा वंश सांगू शकतात. पण त्या पुढे गेलं की आठवण धूसर होते. कोण होते आपल्या पणजोबा, त्यांचे वडील, त्यांच्या आधीचे पूर्वज — ही सगळी माहिती कालांतराने हरवत जाते. पण काही लोक असे आहेत जे शेकडो वर्षांपासून हे सगळं जतन करून ठेवत आले आहेत. त्यांना आपण हेळवी म्हणतो. हेळवी म्हणजे फक्त वंश सांगणारे नव्हेत, ते आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहेत.हेळवी हे पारंपरिक वंशावळ सांगणारे आणि वंशाची माहिती लिहून ठेवणारे लोक आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र सीमाभाग, विशेषतः धारवाड, बेलगाव, बिदर, विजापूर, करवार या भागात हेळवी समाजाचे वास्तव्य आहे. काही ठिकाणी त्यांना भाट असेही संबोधले जाते. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे कुटुंबांची वंशावळ लिहून ठेवणे आणि ती पुढील पिढ्यांना सांगणे. पूर्वी जेव्हा लग्नसमारंभ व्हायचे, तेव्हा हेळवी...
जगायचं थांबलं का?
Poem

जगायचं थांबलं का?

जगायचं थांबलं का?कष्ट मेहनत न करता हीइथं पोट कोणाचं भरलं का?आरक्षण मिळत नाही म्हणूनकोणी जगायचं थांबलं का?मुंगीचेच उदाहरण घ्या ना!एक लहानसा तो जीव आहेकण कण माती जमा करुनतिचं बनवलेलं वारुळ आहेपरिश्रमा वाचून किटकाचंआयुष्याशी कधी जमलं का?...झाडावर उमललेली कळीहळूहळू सुंदर फुल बनतेहसत खेळत जीवन जगाबागडतांनी नेहमी म्हणतेकोणी तरी कुस्करणार आहेम्हणून उमलायचं लांबलं का?...नदी नाले सुर्य चंद्र आणि तारेयांच्या कामात कधी खंड नाहीनिसर्गाच्या नियमानुसार वागणंयांनी केलं कधी बंड नाहीआपला आपला नित्यक्रमअहो यांनी कधी सोडलं का?...अडचणी समस्या प्रश्नहा जीवनाचा एक भाग आहेप्रयत्न करत राहीलं पाहिजेसातत्यातच मिळतो माग आहेदे रे हरी पलंगावरी असं म्हणूनकधी कोणाचं भागलं का?...कामावरती निष्ठा असावीआत्...
ती चिमणी… जी कधी विझली नाही!
Story

ती चिमणी… जी कधी विझली नाही!

ती चिमणी… जी कधी विझली नाही!मागच्या आठवड्यात गावी एक शेजाऱ्यांचे लग्न होते. त्या लग्नासाठी एकटाच गावी गेलो होतो. लग्न संध्याकाळचे होते. दुपारी घरात उन्हाने फार उकडत असल्याने बाजूला चिंचेच्या झाडाच्या सावलीला असलेल्या जनावरांच्या गोठ्यात बाजेवर सहज पडलो होतो. मधूनच मोबाईल चाळत होतो. उन्हाने आळस येऊन डोळ्यांवर झापड येत असायची. तेवढ्यात मला कुणीतरी दाराजवळ बोलत असल्याचा आवाज आला.                      "काय रं? कधी आला?" तिथे दिसत तर कुणी नव्हते. आणि मला 'आरे-तुरे' कोण म्हणत असावे? असा मला प्रश्न पडला. मी आपला इकडे-तिकडे बघत होतो. 'इथे भुताटकी तर नाही ना?' अशी शंका मनात येऊन गेली. कारण लहानपणी अनेकदा पिंपळाच्या, जुन्या वडाच्या, चिंचेच्या झाडांवर भुते असतात, हे अनेकदा ऐकलेले होते....
सोमनाथ पगार यांना ‘कारुण्यबोध’ कवितासंग्रहासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
News

सोमनाथ पगार यांना ‘कारुण्यबोध’ कवितासंग्रहासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

कराड : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत अनुदान प्राप्त साहित्यिक, गीतकार, कवी, ट्रान्सलेटर, ब्लॉगर, युट्युबर म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या नाशिक येथील सोमनाथ पगार यांना त्यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यस्तरीय स्व. राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कराड शहरातील वेणूताई चव्हाण स्मृती सदन येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साम टीव्ही न्यूजचे संपादक निलेश खरे, प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर, महंत अहिल्यागिरिजी महाराज, सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, दिग्दर्शक अरुण कचरे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पत्रकार सेजल पुरवार, सिनेअभिनेते योगेश पोवार, सिनेअभिनेत्री प्...
कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!
Article

कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!

कर्जमाफी: तात्पुरता दिलासा, कायमस्वरूपी नव्हे!शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्या घेऊन प्रहारचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू  यांनी नागपुरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही,असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी  नागपुरात दाखल झाले आहेत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी बच्चू कडू आंदोलन करत असले तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. कारण ती शेतकऱ्यांना त्वरितदिलासादेते,कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील,ही बाब मान्य केली तरी  कर्जमाफी त्यांच्या मूलभूत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही. शेत...
कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा
News

कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा

कुंभारी तांड्यावर गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळाकुंभारी तांडा (ता. पुसद, जि. यवतमाळ) प्रतिनिधी : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी संघटनेतर्फे कुंभारी तांड्यावर सामाजिक भान, प्रेरणा आणि एकतेचा अनोखा मेळ साधणारा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात गावातील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा, नवीन शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा, तसेच सेवानिवृत्त मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तांड्याचे नायक श्री. सुधाकर राठोड यांनी भूषविले, तर प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव राठोड यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (सहसचिव, अखिल भारतीय तांडा सुधार समिती) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, एमपीएससी, पोलीस भरती आणि उच्च शिक्षणाच्या संधींवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि ...
नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह
Article

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रह

नि मि त्त मा त्र – जीवनमूल्ये रुजवणारा प्रेरणादायी कथासंग्रहव्यक्तीच्या अवतीभवती बऱ्याच बरेवाईट घटना घडत असतात. त्यातून त्याची जडणघडण होते. परिणामी एक विशिष्ट व्यक्तिमत्व घडत जाते. संवेदनशील व्यक्तीच्या मनावर अशा घटना परिणाम करतात. आलेले अनुभव अशा संवेदनशील व्यक्तीला शांत बसू देत नाही. परिणामी आपल्या अनुभवांचा उपयोग होऊन समाजाला दिशा मिळावी, पुढील पिढ्याना आपल्या अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी धडपड सुरु होते. यातूनच लेखक संदीप राक्षे यांच्या ‘नि मि त्त मा त्र’ कथासंग्रहाचा जन्म झाला असावा. असे मला वाटते.बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला चाकूरकर, हास्यकवी संजय कावरे यांचे शुभहस्...
‘लघवीची सुटी’ आणि हरवलेलं बालपण.!
Editorial

‘लघवीची सुटी’ आणि हरवलेलं बालपण.!

लहानपणी शाळेचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास होता. त्या काळात प्रत्येक गोष्ट नवीन, निरागस आणि गंमतीशीर वाटायची. त्यातलीच एक मजेशीर आठवण म्हणजे “लघवीची सुटी”. ही सुटी खूपच छोटी असायची मधल्या सुटीच्या आधी काही मिनिटांची. पण आमच्यासाठी ती मोठी घटना असायची. त्या वेळी शाळांमध्ये शौचालयं नव्हती. शिक्षक वर्गात सांगायचे, “लघवीची सुटी झाली!” आणि सगळी मुलं धावत सुटायची. कुणी झाडामागे, कुणी शाळेच्या कुंपणाबाहेर. आम्ही मुलं त्यातही मजा शोधायचो. कुणी म्हणायचं, “पहा माझी लघवी किती लांब गेली!” तर कुणी तिचा रंग बघून टिप्पणी करायचं. त्या क्षणांत कोणतंही दडपण नव्हतं, लाज नव्हती, फक्त खेळ आणि कुतूहल होतं.लहानपणी प्रत्येक गोष्ट आम्हाला उत्सुकतेनं बघायला भाग पाडायची. आपण कसे जन्मलो, वडिलांना दाढी-मिशा आहेत पण आईला का नाहीत, आई-वडिलांच्या लग्नात आपण का नव्हतो असे प्रश्न सतत मनात यायचे. तेव्हा कोणी हसत हसत...