Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
चौऱ्यागढ
Story

चौऱ्यागढ

दरवर्षीप्रमाणेच औंदाही पचमढी मध्यप्रदेशात असलेल्या चौऱ्यागडावर जाण्यासाठी शालक्या उत्सुक होता.तसं त्याच पिढीजात परंपरागत ठाणं चौऱ्यागडच होतं. त्याच्या बापजादयापासून ही मोठ्या महादेवाच्या पुजनाची पंरपरा घराण्यातच होती‌. सोयऱ्या धायऱ्याईलेही त्यांन फोनाफोनी करून कोणाले बजारहाटाच्या गावात भेटलेल्या पावन्या-रावन्याईजोळ निरोप धाडला होता.सिताराम बुढयाच्या खटल्यात सारा 'बचपणा' गेलेला शालक्या तसा इमानदार व काटक गडी होता. दररोजच्या सामानापासून तं सणावारापासून सामानाची सारी खरेदीची जबाबदारी सिताराम पाटील त्याच्या वरच सोडून देत होता. एका नव्या पैशाचाही घापला शालक्यानं हिसोबात आजपर्यंत केला नव्हता. सिताराम बुढयाचा तो विश्वासु घरगढी होता. गावाच्या मध्यभागी एकरभराचा मोठा सागवानी वाडा असलेला व सत्तर एककर जमीनजुमला पाठीमागं असलेला मोठा असामी पाटील पण शालक्या च्या घरी गेला म्हणजे साजरा बकरीच्या दुधाचा सिंग...
अमरावती विभागीय ACUSAT ची कार्यकारीणी घोषित
News

अमरावती विभागीय ACUSAT ची कार्यकारीणी घोषित

अमरावती/डॉ. नरेश इंगळेविद्यापीठ व महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांची रजिस्टर संघटना ACUSAT असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲनिमेटेड टीचर्स महाराष्ट्र तर्फे अमरावती विभागाची २०२४ ते २०२९ पर्यंतची कार्यकारीणी केंद्रीय अध्यक्ष डॉ एम. ए. वाहुळ (माजी उपसंचालक उच्चशिक्षण) व केंद्रीय सचिव डॉ जे. एम. मंत्री यांनी नुकतीच जाहीर केली आहे.कार्यकारिणी मध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ.व्ही.एम. जामोदे (माजी प्रकुलगुरू) अध्यक्षपदी डॉ.ए डब्ल्यू राऊत (माजी सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था), सचिव पदी डॉ.पी.डब्ल्यू. देवतारे,उपाध्यक्षपदी एस.आर. अमरावतीकर (अकोला) कोषाध्यक्षपदी डॉ. एच. एस लुंगे, सहसचिवपदी डॉ .ए. एम. अविनाशे व कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ व्हीं जी ठाकरे (माजी प्राचार्य व सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था) डॉ डब्ल्यू. एस. बरडे (अमरावती जिल्हा प्रभारी) डॉ.जी. टी. पाटील (यवतमाळ जिल्हा प्रभारी) डॉ. ए...
आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती
News

आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती

गौरव प्रकाशन कल्याण (प्रतिनिधी) : "निसर्ग नियम हा आहे की अन्यायाची परिसीमा होते, तेव्हा विद्रोहाचा जन्म होतो. पिचलेला शोषित माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. तो प्रश्न विचारू लागला. याचा परिपाक असा झाला की आंबेडकरी साहित्य अविष्कारले. लेखक त्यातून माणसाची संवेदना मांडू लागला. समताधिष्ठित समाज रचना घडविणे आणि समतेची चळवळ चालविणे हेच आंबेडकरी साहित्य होय" असे प्रतिपादन चौथ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डाॅ चंद्रशेखर भारती यांनी केले.प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, बुद्धभूमी फाउंडेशन, वालधुनी, कल्याणी येथे चौथे आंबेडकरी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे होते. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक निरंजन पाटील होते. तर प्रमु...
गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !
Article

गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !

माझ्या परिचयातील एका जवळच्या व्यक्तीने शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर     मध्यंतरी आपल्या गावाला गेल्यावर तेथील शेतातील पिकाचे, परिसराचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. ते फोटो पाहून मी, ‘माणूस गावापासून दूर गेला की जास्त प्रमाणात आपलं गाव काळजात जपत असतो’ अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याचं कारण म्हणजे,               'ओढ लावते या जीवाला गावाकडची माती, वाट पहात असतात आपुलकीची नाती.' या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या मनातील बोलक्या भावना होय.‘आपण खूप खूप शिकून मोठ्ठं व्हावं’ असं लहानपणी प्रत्येकालाच वाटत असलं तरी शिकून मोठ्ठं झाल्यावर आपण आपल्या गावाला पारखं होणार, परकं होणार याची किंचितसुद्धा कुणाला कल्पना नसते आणि होतंही तसंच... पोटापाण्यासाठी गावाला मुकावं लागल्यावर शहरात किंवा दूर ...
दशरथ मांझींची प्रेरणादायी भेट!
Article

दशरथ मांझींची प्रेरणादायी भेट!

दशरथ मांझी यांचा जन्म १९३४ साली बिहारमधील गया जिल्ह्यातील गेहलौर या छोट्याशा गावात मजूर कुटुंबात झाला.त्याचे कुटुंबिय पडीक जमिनीवर शेती करीत.मजुरीही करीत. त्यांचं जगणं हलाखीचं  होतं. त्यांना शाळेत जाण्याची संधी न मिळाल्याने ते निरक्षर राहिले.मात्र बालपणापासून ते संघर्षशील,जिद्दी होते.पुढे फाल्गुनी देवी या तरूणीसोबत त्यांचं लग्न झालं.त्यांचं पत्नीवर खूप प्रेम होतं.तिच त्यांच्या जगण्याची प्रेरणा आणि शक्ती होती.त्यांना एक कन्यारत्नही झालं.जीवन कष्टमय असलं तरी आनंददायी होतं.अचानक पत्नी आजारी पडली.तिच्या उपचारासाठीचा दवाखाना ५५कि.मी.अंतरावर होता.त्यासाठीचा रस्ता अवघड पर्वतांवरून जात होता.पत्नीला रूग्णालयात उपचारासाठी घेऊन ते निघाले.हा प्रवास जीवघेणा, खडतर असाच होता.प्रवासाची दगदग सहन न झाल्याने, वाटेतच पत्नी फाल्गुनी देवीचं निधन झालं.या दुखद घटनेचा मांझी यांच्या मनावर आघात झाला. केवळ योग्य...
असोसिएशन ऑफ स्मॉल ॲण्ड्र मिडिया न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या शेगाव येथील अधिवेशनाचे जय्यत तयारी सुरू
News

असोसिएशन ऑफ स्मॉल ॲण्ड्र मिडिया न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या शेगाव येथील अधिवेशनाचे जय्यत तयारी सुरू

गौरव प्रकाशन शेगाव (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव दिनांक 17 फेब्रुवारी 2025 आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान या एक दिवशीय अधिवेशनामधील कार्यक्रम पत्रिका अशी, सकाळी १०.०० वाजता. संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच मुख्य अधिवेशनला १२.१५ वाजता प्रारंभ होईल दरम्यान कार्यक्रमाचे स्थळी आल्यानंतर सभासदांनी आपल्या आगमनाची नोंद स्वागत कक्षात करणे आवश्यक आहे.आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.● हे वाचा – दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणीमान्यवरांचे स्वागत समारंभ समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक राज्यसचिव सुभाष लहाने हे करतील. पहिल्या सत्राचे औपचारिक उद्घघाटन मा.मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव मा.श्री विद्याधर महालेजी यांचे शुभहस्ते होणार आ...
हरभर्याचा हुया
Article

हरभर्याचा हुया

पौष महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजे आमच्या ग्रामीण बोली भाषेत या महिन्याला पूस म्हणत. मकरसंक्रांती (तीसकरात हे तीळसंक्रांतीचा झालेला अपभ्रंश) सरली म्हणजे महिलांना वाणात वाटायला हिरवाकच हरभरा लागायचा. बस काही हप्त्यात बऱ्याच लोकांची हरभऱ्याची शेतं सोगांयला तयार असायची. एरव्ही दिवाळी पासून दोन महिने सलग शिदोरी सोबत घेतली म्हणजे वावराची सोकारी करायला लागायची.तसा फक्त गवत कापणाराईचा व कापूस वेचणाऱ्या बायाईचा बराच काव असायचा. आता खायची गोष्ट तर खाणाचं तुम्ही सोकारी करा की आणखी काही करा.पंरतु मायेच्या भारे नेणाऱ्यांची संख्याही काही कमी नसायची.बरं हरभरा घेतांना दिसलाच व आपण हटकलंच तर"बस मुठभरच घेतो भाकरसंग खायले" असं बोलून मोकळं व्हायची एवढं बोलल्यावर आपण काय डोक्सं आपटणार. असा तो मजेशीर किस्सा असायचा. आमच्या धुऱ्यावरच कुऱ्हाडे बुडण्याच्या मेरीवर बाभुळचं गर्द हिरवगार झाड अजूनही शाबूत आहे. त्या...
कौटुंबिक सामंजस्य: एक आकलन
Article

कौटुंबिक सामंजस्य: एक आकलन

कुटुंबामध्ये आपुलकी, जिव्हाळा, भावना, प्रेम, राग, लोभ अशा अनेक बाबींचा अंतर्भाव असतो. माता, पिता व अपत्य आणि अन्य आप्तसंबंधी व्यक्तींनी मिळून कुटुंब तयार होत असते. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कुले कुटुंबास ‘प्राथमिक समूह’ असे म्हणतात. कुटुंबाचे संयुक्त, विभक्त, भग्न असे प्रकार पडतात. पूर्वी संयुक्त कुटुंबाचे प्रचलन मोठ्या प्रमाणात होते.‘एकमेकास साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे कुटुंब कार्यप्रवण राहत असे. मानवी जीवनाला शिस्त, सुकरता आणि सुलभता यावी म्हणून कुटुंबाची निर्मिती झाली. लैंगिक गरजांची पूर्ती, प्रजोत्पादन, संगोपन,योग्य सामाजिकरण अशा अनेक महत्त्वपूर्ण समाजमान्यभूमिकांची व्यवस्था कुटुंबाद्वारे केली जाते. त्यामुळेच विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांचा जवळचा सहसंबंध असतो. मानवाचे जतन, बाल संगोपन, सुयोग्य सामाजीकरण, मानवी जैविक घटकांचे समाजशील मानवी प्राणी बनवण्याची प्रक्रि...
प्रज्ञासूर्याची सावली
Poem

प्रज्ञासूर्याची सावली

लाख असतीलमाऊल्याअन् लाख असतीलसावलीलाखात एक झालीप्रज्ञा सूर्याची सावली ……जरी शिकली नाहीशाळासाहेबांना शिकविलेसाहून अपार कष्टबोधीसत्व घडविले …..मृत्युचे रंग कितीरमाई ने पाहिलेशांतपणे सर्व मृत्युनाअश्रू रमाईने वाहिले ….सरणावर जळत होतेलाकडाचे निखारेजळत होत रमाईच काळीजकुणी नाही पाहिले ….निखाऱ्यातुंन निघालीप्रज्ञा सूर्याची सावलीकोटी कोटी लेकरांचीमाय झाली रमाई माऊलीरमाई माऊली…..राजेंद्र क. भटकरबडनेराहे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा...
राजारामजी वरघट यांचे दुःखद निधन
News

राजारामजी वरघट यांचे दुःखद निधन

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : मूळचे रामगाव रामेश्वर ता. दारव्हा जि यवतमाळ  येथील रहिवाशी व किरण नगर,अमरावती येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सैनिक राजारामजी वरघट  यांचे दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय ८४  वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी बेबिबाई, मुले बाळू उर्फ मनोहर, विनोद, विजय मुलगी सौ.रेखा हजारे, स्नुषा सौ.ज्योती,सौ. वैशाली, सौ.कविता, नातवंडं  आशू, तनु, आस्था, दानी, राणी,स्वराज, प्रिया मोखळे ,शुभम असा आप्त परिवार आहे.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा...