Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदान
News

सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदान

सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदानअमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात स्वयंसेविकांसाठी उद्बोधन कार्यक्रम तसेच विकसित भारत २०४७ या उपक्रमांतर्गत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पुनम चौधरी (कार्यकारिणी सदस्य, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी) व मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय काळे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा अढाऊ यांनीही विद्यार्थिनींन...
मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!
Article

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात आज निधन झाले. जांभळढव्हपासून बिरडं पर्यंतचा प्रवास आज थांबला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव येथील ते रहिवासी होते.मराठवाड्याच्या तहानलेल्या मातीला, दुष्काळाने होरपळलेल्या शिवारांना आणि उपाशीपोटीही मुले शिकवणाऱ्या ग्रामीण आईच्या जगण्याला शब्द देणारा सशक्त आवाज आज कायमचा थांबला आहे. ख्यातनाम कथाकार भास्कर तात्याबा चंदनशिव यांच्या निधनाने मराठी साहित्य सजीव कथनकलेचे एक तेज गमावून बसले आहे. त्यांच्या कथांनी केवळ ग्रामीण समाजाचेच नव्हे, तर जातीय, स्त्रीवादी आणि दलित जीवनाचे दु:ख, आशा, संघर्ष आणि मूक करुणा आपल्या समोर उभी केली.१२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगावात जन्मलेल्या संवेदनशील या बालकाने पुढे मराठी साहित्याला कथाकार भास्कर चंदन...
कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची हृदयद्रावक आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी, पतीने गळफास
News

कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची हृदयद्रावक आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी, पतीने गळफास

छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री) – राज्यातील शेतकरीवर्गावर वाढत असलेल्या कर्जाच्या दबावामुळे शेतकरी दांपत्याने हृदयद्रावक आत्महत्या केली. फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील 43 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी विलास रामभाऊ जमधडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवले.कर्जाचा ताण आणि शेतीतून अपुर्या उत्पन्नामुळे विलास आणि रमाबाई यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून साधत होते, मात्र त्यांच्यावर बँक, सोसायटी आणि खासगी सावकारांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावर बचत गटाचेही कर्ज असल्याचे स्पष्ट झाले.शुक्रवारी रमाबाई यांनी शेतातील विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलं आणि नातेवाईक घरी परतले. परंतु सायंकाळी पाचच्या सुमारास विलास जमधडे यांनी गावापासून दोन किलोमीटर दूर शेतात जाऊन व्हॉट्सअॅप ग्रुपवर “कर्जबाज...
रजोनिवृत्ती : स्त्रीच्या आयुष्यातील नवा टप्पा आणि बदलांचा प्रवास
Gerenal

रजोनिवृत्ती : स्त्रीच्या आयुष्यातील नवा टप्पा आणि बदलांचा प्रवास

स्त्रीचे आयुष्य म्हणजे ऋतूंचा प्रवास. बालपणापासून किशोरवय, तरुणाई, मातृत्व, आणि नंतर वृद्धत्व असा हा प्रवास असतो. या प्रत्येक टप्प्यात शरीर आणि मनामध्ये अनेक बदल होत राहतात. मासिक पाळी सुरू होणे हा जसा एका नव्या जीवनाचा प्रारंभ असतो, तसाच मासिक पाळी थांबणे म्हणजे एका वेगळ्या टप्प्याची सुरुवात असते. या टप्प्यालाच आपण रजोनिवृत्ती म्हणतो.रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या प्रजननक्षमतेचा शेवट दर्शवते. साधारणतः 45 ते 55 वयोगटात ती दिसून येते, पण काहींमध्ये ती 40 च्या आसपासही सुरू होते. जेव्हा सलग बारा महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा या स्थितीला रजोनिवृत्ती मानले जाते. हा काळ फक्त शारीरिक बदल घडवून आणत नाही तर मानसिक आणि भावनिक बदलही घडवतो.या काळात स्त्रीला अनेक नवीन अनुभवांना सामोरे जावे लागते. सुरुवातीला मासिक पाळी अनियमित होऊ लागते. कधी दोन महिने पाळी थांबते, पुन्हा येते, तर कधी अचान...
आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार
News

आशिया कप २०२५ ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाचा नकार

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. हा विजय ऐतिहासिक ठरला असला तरी सामन्यानंतरचा प्रसंग अधिक गाजला. कारण भारतीय संघाने विजेत्यांची ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.प्रेमदासा स्टेडियमवर सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ जवळपास तासभर उशिरा सुरू झाला. या विलंबामुळे मैदानावर गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते द्यायची होती. नक्वी हे भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जात असल्याने भारतीय संघाने सामूहिकरित्या व्यासपीठावर जाण्यास नकार दिला.सूत्रसंचालक सायमन डुल यांनी समारंभ थांबवताना जाहीर केले की, “भारतीय संघ आज रात्री पारितोषिकं स्वीकारणार नाही.” परिणामी संघाचा सामूहिक फोटो घेण्यात आला नाह...
कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक
Article

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिककला ही आत्माविष्काराची पहिली पायरी आहे, प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी कला असावी. माणसाला कधीही उपाशी ठेवत नाही. कला निराशामय काळोखातील एक प्रकाशमान बिंदू आहे, जो माणसाला वादळातील पणतीप्रमाणे सतत संघर्ष करत जगण्याची प्रेरणा देतो. अशा सुंदर लालित्यपूर्ण लेखन करणाऱ्या पुसद जि यवतमाळ येथील लेखिका निशा डांगे यांची कपाळ गोंदण ही ललितलेख असलेली साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. लेखिकेने स्त्री जीवनातील अनेक सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरील आलेले अनुभव या कलाकृतींमधून मांडले आहेत.कपाळ गोंदण या कलाकृतीतील ललित साहित्याच्या अनुषंगाने मुखपृष्ठावर साकारलेल्या भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रातिनिधिक चित्राने स्त्री जीवनातील अनेक गोष्टींना अधोरेखित केले आहे. ही कलाकृती स्त्री जीवनाला केंद्रस्थानी ठेवून तिच्या भोवती ...
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह
Article

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रहअरुण विघ्ने सर  संवेदनशील,आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या विचारचा जबरदस्त पगडा असणारा व त्यांच्या  विचाराचा सुगंध,परिमळ सर्वदूर आपल्या गझलेतून,कवितेतून फैलवणारा निर्मळ मनाचा साहित्यिक. 'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' अशी कळकळीची आस असणारा गझलकार, समीक्षक,स्फुट लेखक,व्यक्तीविशेष असा चौफेर लेखन करुन आपल्या वेगळ्या लेखन शैलीचा ठसा उमटविणारा साहित्यिक मित्र.निळ्या पाखरांनी नभाला गवसणी घालत नवे गीत गावे. नव्याचा स्विकार करत असतांना प्रसंगी उपाशी राहून समजदार होत स्वकमाई करुन आपल्या कमाईचा हिस्सा आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी खर्च करावा.स्वाभिमानाने भीमाच्या विचार रथाचे सारथ्य करावे ,आपल्या लेखनीच्या द्वारे जनाचा उद्धार करावा.कारण भीमाचे उपकार आपण कदापी विसरू नये.स्वतः लोकसेवक होऊन बुध्द वचनास जागवावे.हा विचार. रुजवता...
मुलींच्या आरोग्याचा जागर – इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात रूबेला लसीकरण शिबिर
News

मुलींच्या आरोग्याचा जागर – इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात रूबेला लसीकरण शिबिर

गौरव प्रकाशन अमरावती : विकसित भारत 2047 या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थिनींसाठी मोफत रूबेला लसीकरण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथक आणि भावना कॅन्सर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या उपक्रमात महाविद्यालयातील 43 विद्यार्थिनींनी लसीकरण करून घेतले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या स्त्रीरोग व कॅन्सर तज्ञ डॉ. भावना सोनटक्के मॅडम यांनी विद्यार्थिनींना रूबेला लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच किशोरवयीन मुलींसाठी आहार, योग व व्यायाम यांचा निरोगी आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. ...
मी आंबेडकरी, RSS च्या विजयादशमीला जाणार नाही–कमलताई गवईंचे स्पष्ट स्पष्टीकरण
News

मी आंबेडकरी, RSS च्या विजयादशमीला जाणार नाही–कमलताई गवईंचे स्पष्ट स्पष्टीकरण

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यास आपण मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची बातमी ही धांदात खोटी असून आपण निमंत्रण स्वीकारलेलेच नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्पष्ट केले आहे. कमलताई गवई यांनी समाजमाध्यमावर स्वहस्ताक्षरी पत्र प्रसारित करत आपली भूमिका स्पष्ट केली. "मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक आहे. मला विश्वासात न घेता वा लेखी संमती न घेता अशा बातम्या प्रसारित करणे हे RSS चे षड्यंत्र आहे," असे त्यांनी पत्रात नमूद केले.पत्रातील ठळक मुद्देआरएसएसच्या अमरावतीतील विजयादशमी सोहळ्यास मी जाणार नाही.ही बातमी पूर्णतः खोटी असून अपप्रचार आहे.दादासाहेब गवई चॅरिटी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझे घराणे आंबेडकरी विचाराशी निष्ठावान आहे.आमच्यासाठी विजयादशमीपेक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिन अधिक...
राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा
News

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारा

राज्यभरात पावसाचा कहर; हवामान खात्याचा मराठवाड्यासह महाराष्ट्राला इशारामुंबई, : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषत: मराठवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यास आज रेड अलर्ट देण्यात आला असून, पुणे शहरात सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात दहा हजार क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल...