Monday, March 9

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!
News

जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!

जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे रविवारी पहाटे खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आग लागल्यानंतर तब्बल २० मिनिटे कोणीही लक्ष दिलं नाही आणि वॉर्डबॉय तिथून पळून गेले.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, “जेव्हा धूर दिसायला लागला तेव्हा मी डॉक्टर आणि नर्सला सांगितलं. पण कुणीही काही केलं नाही. प्लॅस्टिकच्या ट्यूब जळत होत्या आणि धूर पसरत होता. वॉर्डबॉय सगळे पळून गेले. मीच माझ्या आईला आयसीयूतून बाहेर काढलं. तिची प्रकृती काय आहे, हेही कुणी सांगत नाही.”मात्र रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनुराग धाकड यांनी हे आरोप फेटाळले. ते म्हणाले, “घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये ११ रुग्ण होते. आमच...
दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!
Article

दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!

दहशतवादाबाबत जगाची दुटप्पी भूमिका.!दहातवादाबाबत जगाचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. दहशतवादाबाबत जगाची भूमिका दुटप्पी स्वरूपाची दिसून येते.दहशतवादाबाबत जगाच्या दुहेरी दृष्टिकोनाचा अर्थ असा आहे की काही देश दहशतवादाला एक गंभीर जागतिक समस्या म्हणून ओळखतात, तर काही जण त्यांच्या स्वतःच्या धोरणात्मक किंवा राजकीय फायद्यासाठी विशिष्ट दहशतवादी गटांविरुद्ध मवाळ भूमिका घेतात किंवा त्यांचा गैरफायदा घेतात. भारताने या दुहेरी मानकांवर सातत्याने टीका केली आहे आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका सारखे देश दहशतवादाविरुद्ध "कठोर" धोरण स्वीकारताना तालिबान आणि हमास सारख्या गटांशी वाटाघाटी करतात.मात्र पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत मात्र संदिग्ध भूमिका घेतात.काही देश दहशतवादी गटांना त्यांचे राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी समर्थन देतात किंवा मदत करतात, ज्यामुळे ते स...
धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकर
News

धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकर

धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकरजालना : महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आली आहे आणि या लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे महत्वाचे विधान केले असून, राज्याच्या राजकारणात या वक्तव्यामुळे नवा राजकीय भूचाल निर्माण झाला आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ओबीसींना सध्या २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेलंगणा राज्यात हेच आरक्षण ६२ टक्क्यांपर्यंत नेले गेले आहे. तसाच प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो. पण त्यासाठी ओबीसी समाजाने सत्ता हाती घेतली पाहिजे. धनगर समाजाने आता पुढे येऊन ओबीसींच्या हक्कासाठी नेतृत्व घ्यावे आणि विधानसभेवर सत्ता मिळवून आरक्षण वाढवावे.”ते पुढे म्हणाले, “ओबी...
भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई! बायकोनं दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, Video व्हायरल
News

भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई! बायकोनं दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, Video व्हायरल

भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई! बायकोनं दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, Video व्हायरलमुंबई :“भर रस्त्यात नवऱ्याची धुलाई!” हे ऐकून कुणालाही थोडं आश्चर्य वाटेल, पण सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका संतापलेल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं आणि अक्षरशः भर रस्त्यात त्याची चांगलीच धुलाई केली!@Gharkekalesh या एक्स (माजी ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओत दिसतं की, एक पुरुष एका अनोळखी महिलेसोबत रस्त्यावर गप्पा मारत असतो. त्याचवेळी त्याची पत्नी तिथे पोहोचते आणि थेट त्या महिलेला कानशिलात लगावते. नवरा मध्ये पडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण बायकोचा संताप इतका वाढतो की तिनं नवऱ्यालाही भर रस्त्यात चोप दिला.क्षणातच हा प्रकार पाहायला आ...
बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल
Article

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूलनाशिकचे साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा चांदणभूल हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. खरे तर या संग्रहाला ललितलेखन म्हणणे वावगे ठरेल कारण या संग्रहातील लेखन हे लेखकाच्या बालपणापासून तर साठी गाठण्यापर्यंतचा थोडक्यात प्रवास मांडला आहे त्यामुळे या संग्रहाला आत्मलेखन किंवा स्वानुभवलेखन किंवा आत्मचरित्र म्हणता येईल असे मला वाटते. चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाकडे पाहिले की, प्रत्येकाला आपले बालपण आठवते, कधी आई सोबत, तर कधी आजी आजोबांसोबत तर कधी मामा मावशी सोबत चांदण्यारात्री आभाळाकडे बघून चांदण्या मोजायच्या आणि चंद्राच्या कला अनुभवायच्या इतकी उत्सुकता लागलेली असायची.चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, माणसाच्या गत आयुष्याचे संदर्भ रेखाटले आहेत की काय असे वाटते. विजयकुमार मिठे यांच्या लेखनीची भाषा ग्रामीण...
कफ सिरप मृत्यू: 12 लहान मुलांचा बळी, 4 राज्यांमध्ये औषधावर बंदी
News

कफ सिरप मृत्यू: 12 लहान मुलांचा बळी, 4 राज्यांमध्ये औषधावर बंदी

कफ सिरप मृत्यू: 12 लहान मुलांचा बळी, 4 राज्यांमध्ये औषधावर बंदीराजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भेसळयुक्त कफ सिरपमुळे 12 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, या मुलांनी विशिष्ट कफ सिरप घेतल्यानंतर त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले आणि मृत्यू झाला.केंद्रीय सरकारने या घटनेनंतर सर्व राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत की दोन वर्षांखालील मुलांना कोणतेही कफ सिरप देऊ नये. मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना दिलेल्या कफ सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल हे औद्योगिक वापरासाठी असलेले धोकादायक घटक आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे घटक मूत्रपिंड आणि मेंदूला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.सध्या कोल्ड्रफ आणि नेक्सा डीएस या दोन औषधांवर तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातही 26 हजार लिटर कफ सिरपचा साठा नष्ट करण्...
फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!
News

फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!

फक्त ‘दलित’ असल्याने रूम नाकारली? अकोल्यात वंचित नेत्या डॉ. स्नेहल सोहनी यांचा गंभीर आरोप!अकोला (प्रतिनिधी) : अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सभेसाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. स्नेहल सोहनी यांना एका हॉटेलमध्ये ‘जात’ आणि ‘पक्षीय चिन्ह’ पाहून रूम देण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नेमके काय घडले?वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेसाठी डॉ. स्नेहल सोहनी या मुंबईतून अकोल्यात दाखल झाल्या होत्या. मुक्कामासाठी त्यांनी रायझिंगसन हॉटेलमध्ये जाण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांना हॉटेलमध्ये रूम दाखवण्यात आली. मात्र, त्यांचे सामान उघडल्य...
बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट
Article

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंट

बंजारा समाज मोर्चे आणि पक्षांचा सहभाग : सामाजिक न्यायासाठी संघर्ष की राजकीय स्टंटबंजारा समाज हा पारंपरिकरीत्या व्यापारी व जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारा समाज आहे. "गोर" म्हणून ओळखला जाणारा हा समाज भारताच्या प्रत्येक राज्यात पसरलेला आहे. त्यातल्यात्यात महाराष्ट्र, तेलंगणा,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश,कर्नाटक,गुजरात,राजस्थान येथे यांची लक्षणीय वस्ती आहे.आज बंजारा समाज प्रामुख्याने शेतमजूर, कामगार,नावालाच लहान व्यापारी व बोटावर मोजण्याइतके सरकारी नोकरदार म्हणून जगतो आहे.परंतु हा समाज सामाजिक न्यायाच्या शर्यतीत खूप मागे राहिलेला आहे. व आज मागे राहिल्याची भावना समाजात तीव्र होत आहे.भारतातील लोकशाहीत कोणत्याही समाजघटकाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलने, मोर्चे,अर्ज,निवेदन ही साधने वापरावी लागतात. बंजारा समाज,ज्याला लांब इतिहास आहे,तो देखील शिक्षण,नोकरी,सामाजिक न्याय या प्रश्नांवर संघर्ष करीत आल...
सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा
News

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामा

सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! झांसीत आजीचा भन्नाट कारनामाझांसी : सुनांचे दागिने गेले, आजी गेली प्रेमात! – हे वाक्य ऐकायला जरी विनोदी वाटत असलं तरी यामागची कहाणी एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेली आहे. झांसी जिल्ह्यातील सायवारी गावात एक ४० वर्षीय आजी आपल्या प्रियकरासोबत रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.ही आजी दोन मुलांची आई आणि दोन नातवंडांची आजी असून, तिच्या ‘प्रेमाच्या उड्या’मुळे गावात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. कुटुंबातील सर्वजण या घटनेमुळे हादरले असून, घरातील सुनांचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.घटनेचा तपशील:महिला ही कामता प्रसाद यांची पत्नी असून, ती गेल्या अडीच वर्षांपासून वीटभट्टीवर काम करत होती. त्याच ठिकाणी तिची ओळख अमर सिंह प्रजापती नावाच्या पुरुषाशी झाली. ओळख प्रेमात बदलली आणि दोघां...
महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
News

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरेपुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आ...