चारगड प्रकल्प ग्रस्तांच्या २.३२ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी !
आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प ग्रस्तांना मिळाला दिलासा !
आमदार देवेंद्र भुयार यांनी मानले अजितदादा पवार यांचे आभार !
गौरव प्रकाशन
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड या लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम अर्धवट स्वरूपात असून बंद अवस्थेत पडलेले आहे त्याचा लाभ अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही खोपडा गावातील मुल्यांकणाचे सुधारीत किंमत अंतर्भूत करून सानुग्रह अनुदानाचा वंचित लाभार्थ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे रेटून धरल्यामुळे निम्न चारगड लघु प्रकल्प खोपडा येथील नागरिकांना २.३२ कोटी रुपये किमतीच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे चारगड प्रकल्प ग्रस्तांना आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
निम्न चारगड प्रकल्प खोपडा येथील मुल्यांकणाचे सुधारीत किंमत अंतर्भूत करून सानुग्रह अनुदानाचा प्रस्तावः शासनास विशेष बाब म्हणून मंजुरीस्तव सादर करणेबाबत महसूल यंत्रणेने दि. २२.०७.२०१९ रोजी रु. ४४.८७ कोटीचा निवाडा घोषित केला होता. परंतु त्यावर खोपडा गावाचे ग्रामस्थांनी घराचे मुल्यांकनाबाबत अंकगणीतीय चुकामुळे व मालमतेचा काही भाग सुटलेला असल्याबाबत तक्रार नोंदविल्या होत्या. त्यानुसार सदर प्रकरणी मुल्यांकनांची दुरुस्ती आपल्या स्तरावर झालेली असून सदर सुधारीत मुल्यांकनुसार येत असलेला नविन मोबदला ग्रामस्थांना मिळणेकरीता त्याबाबतचा प्रस्ताव शासनास विशेष बाब अंतर्गत सानुग्रह अनुदान म्हणून तात्काळ मंजुरीस्तव सादर करण्यात यावा व त्याबाबतची आवश्यक कार्यवाही तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश देऊन निम्न चारगड प्रकल्प ता. मोर्शी जि. अमरावती खोपडा गावातील मुल्यांकणाचे सुधारीत किंमत अंतर्भूत करून सानुग्रह अनुदानाचा प्रस्तावः शासनास विशेष बाब म्हणून मंजुरीस्तव सादर करणेबाबत आमदार देवेन्द्र भुयार यांनी मुख्य अभियंता विशेष प्रकल्प जलसंपदा विभाग अमरावती यांना दि. २२ ऑक्टोंबर २०२२ रोजी निर्देश दिले होते.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये खोपडा येथील घरांचा निवाडा दिनांक २२/०७/२०१९ ला करण्यात आला. सदर निवाडा करतांना अंदाजपत्रकामध्ये चुका झाल्याचे नागरीकांचे आक्षेप असल्यामुळे नागरिकांना मोबदला मिळत नसल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे पाठपुरावा करून अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार खोपडा येथील नागरीकांना मोबदला मिळऊन देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मोर्शी विधानसभा मतदार संघातील सिंचन प्रकल्पांचे निराकरण कारणे बाबत शासन स्तरवर बैठक आयोजित करण्याची मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांना तत्काळ निर्देश देऊन निम्न चारगड लघु प्रकल्प खोपडा येथील बदल झालेल्या मूल्यांकनातील फरकाचा मोबदला देण्यास विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याचे निर्देश दिले असता महाराष्ट्र शासनाने २० आक्टोंबर २०२३ रोजी ११९ मूल्यांकन सुधारित झालेल्या प्रस्तावांच्या मूल्यांकन फरकाची देय २.३२ कोटी रुपये किमतीच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.