महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कडक शिस्त यासाठी ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या एखाद्या प्रशासकीय निर्णयामुळे नव्हे, तर आषाढी वारीतील वारकऱ्यांनी व्यक्त केलेल्या अनोख्या सन्मानामुळे त्यांच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
पुण्याकडून सासवडच्या दिशेने निघालेल्या पायी वारीदरम्यान अनेक वारकरी हातात तुकाराम मुंढे यांचे पोस्टर्स आणि फलक घेऊन चालताना दिसले. या पोस्टर्सवर “जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कढ… तुकाराम!” असा संदेश लिहिलेला होता. कोणत्याही राजकीय नेत्याऐवजी एका सनदी अधिकाऱ्याला अशा प्रकारे वारीत मानाचा सन्मान मिळाल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले.
या दृश्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेक नागरिक तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत. वारकऱ्यांनी व्यक्त केलेला हा सन्मान त्यांच्या कामावरील विश्वासाचे प्रतीक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
भेसळविरोधी मोहिमेमुळे पुन्हा चर्चेत
सध्या तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम सुरू असून, अनेक ठिकाणी धडक तपासण्या आणि कारवाया करण्यात येत आहेत. लोकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांची राज्यभर चर्चा सुरू आहे.
याच कामाची दखल घेत वारकऱ्यांनी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर या घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी प्रामाणिक अधिकाऱ्याला मिळालेला हा सन्मान प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
टीप: वारीत दिसलेल्या पोस्टर्स आणि व्हिडिओंची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. संबंधित संदेश वारकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रदर्शित केल्याचे व्हिडिओंमधून दिसते.
आधी आई गमावली, आता वडिलांचेही निधन; ‘तारक मेहता’च्या बाघावर दुःखाचा डोंगर कोसळला










