📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? पक्षाच्या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ.!

On: July 13, 2026 6:31 PM
आम्हाला फॉलो करा:
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह; पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याची नोटीस

मुंबई | प्रतिनिधी

राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

9 जुलै रोजी पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक नियमबाह्य आणि अवैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या नोटीसची प्रत राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही पाठवण्यात आली आहे. तसेच, नवीन निवडणूक होईपर्यंत विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची यादी अमान्य मानावी, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा स्वीकारली होती. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाली होती. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचीही शपथ घेतली होती.

मात्र, आता पक्षातीलच वरिष्ठ नेत्याने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने या प्रकरणाने नवे राजकीय वळण घेतले आहे. या नोटीसला सुनेत्रा पवार किंवा पक्षाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीप : या वृत्तातील माहिती संबंधित नोटीस आणि समोर आलेल्या दाव्यांवर आधारित आहे. संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर वृत्त अद्ययावत केले जाईल.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!