📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

‘सैराट’ फेम अरबाज शेखला उद्योगमंत्री उदय सामंतांची 1 लाखांची मदत; वडिलांच्या उपचारासाठी सरकार सरसावले

On: July 14, 2026 11:32 AM
आम्हाला फॉलो करा:
'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेखला वडिलांच्या उपचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याचे छायाचित्र

मुंबई | प्रतिनिधी

‘सैराट’ चित्रपटातून ‘सल्या’ ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर उपचारासाठी मोठा खर्च होत असल्याची माहिती देणारा त्याचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून त्याचा धनादेशही अरबाजकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या मदतीमुळे उपचाराचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना तातडीने सोलापूरला जाऊन कुटुंबाची भेट घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सोलापूरमधील वळसंगकर हॉस्पिटलने उपचाराची जबाबदारी स्वीकारत आवश्यक वैद्यकीय मदत देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अरबाज शेखने सुरुवातीला एका खासगी रुग्णालयावर त्यांच्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची अन्न व औषध प्रशासनाने चौकशी केली. तपासात काही गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित मेडिकलची औषध विक्री तात्पुरती बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

सरकारकडून मिळालेल्या मदतीमुळे आणि वैद्यकीय उपचारासाठी मिळालेल्या सहकार्यामुळे अरबाज शेखच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या संवेदनशील निर्णयाचे सोशल मीडियावरही अनेकांकडून स्वागत होत आहे.

आधी आई गमावली, आता वडिलांचेही निधन; ‘तारक मेहता’च्या बाघावर दुःखाचा डोंगर कोसळला

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!