📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 254 जादा एसटी बसेसची सुविधा

On: July 8, 2026 8:36 PM
आम्हाला फॉलो करा:
आषाढी एकादशी 2026 निमित्त अमरावतीतून पंढरपूरसाठी 254 जादा एसटी बसेस सुरू

गौरव प्रकाशन प्रतिनिधी :

अमरावती : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 20 जुलै ते 30 जुलै या कालावधीत अमरावती विभागातून एकूण 254 जादा एसटी बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत.

भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवास करता यावा यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास आणखी बसेस उपलब्ध करून देण्याची तयारीही महामंडळाने ठेवली आहे.

कोणत्या आगारातून किती बसेस?

  • अमरावती – 36
  • बडनेरा – 36
  • परतवाडा – 30
  • वरुड – 36
  • चांदूर रेल्वे – 21
  • दर्यापूर – 30
  • मोर्शी – 32
  • चांदूर बाजार – 33

अशा प्रकारे एकूण 254 विशेष बसेस पंढरपूरच्या यात्रेसाठी धावणार आहेत.

गावातूनही थेट एसटीची सुविधा

महामंडळाने यंदा वारकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी उपलब्ध असल्यास त्या गावातूनच थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस सोडली जाणार आहे. यासाठी संबंधित गावातील भाविक, सरपंच किंवा नागरिकांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा.

परतीच्या प्रवासासाठीही आरक्षण

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून परतीच्या प्रवासाचे आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विशेष बसमध्ये चालक आणि वाहक यांची नावे व मोबाईल क्रमांक स्पष्टपणे प्रदर्शित केले जाणार आहेत, त्यामुळे भाविकांना आवश्यकतेनुसार संपर्क साधणे सोपे होणार आहे.

प्रमुख मार्ग व भाडे

  • अमरावती – पंढरपूर : ₹1046
  • दर्यापूर – पंढरपूर : ₹1024
  • परतवाडा – पंढरपूर : ₹1135
  • वरुड – पंढरपूर : ₹1212
  • चांदूर रेल्वे – पंढरपूर : ₹1112
  • मोर्शी – पंढरपूर : ₹1146
  • चांदूर बाजार – पंढरपूर : ₹1124

विभाग नियंत्रकांचे आवाहन

विभाग नियंत्रक सचिन डफळे यांनी जिल्ह्यातील वारकरी आणि भाविकांना जवळच्या एसटी आगारात संपर्क साधून आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह शासकीय बस सेवेचा लाभ घेऊन आषाढी यात्रेचा आनंद घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

पेठवडगाव एसटी स्टँड परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या झाल्यानंतर पोलीस तपास करताना | Kolhapur Crime News

कोल्हापूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून एसटी स्टँडवर पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या; आरोपी फरार

साताऱ्यातील ठोसेघर येथे 14 वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतरची प्रतीकात्मक छायाचित्र.

साताऱ्यात धक्कादायक घटना! नववीतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.!

विधानपरिषदेत ऑर्केस्ट्रा परवाना सुधारणा विधेयकावर बोलताना आमदार संजय खोडके

ऑर्केस्ट्रा परवान्यावर आ. संजय खोडके यांचा सवाल; ‘यंत्रणाच कुचकामी असेल तर कायदा करून काय उपयोग?’

अमरावती महानगरपालिकेचे नवे आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले आणि वर्षा लड्डा बदली बातमी

अमरावती महापालिकेत मोठा बदल! वर्षा लड्डा यांची 3 महिन्यांत बदली; डॉ. मंगेश गोंदवले नवे आयुक्त

एक दिवसाचे मुख्यमंत्री झाल्यास काय कराल? तुकाराम मुंडेंचे उत्तर देताना घेतलेले छायाचित्र

एक दिवसाचे मुख्यमंत्री झालो तर? तुकाराम मुंडेंचे उत्तर ऐकून सर्वजण थक्क; सत्ता नव्हे, कामालाच दिले प्राधान्य

समोसे खरेदी करताना लोको पायलटचा व्हायरल व्हिडिओ; ट्रेन थांबवल्याच्या दाव्यावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

समोसे खाण्यासाठी ट्रेन थांबवली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं