📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

साताऱ्यात धक्कादायक घटना! नववीतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.!

On: July 9, 2026 12:32 PM
आम्हाला फॉलो करा:
साताऱ्यातील ठोसेघर येथे 14 वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतरची प्रतीकात्मक छायाचित्र.

सातारा :

सातारा जिल्ह्यातील ठोसेघर येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा आणि क्लाससाठी तयारी करत असताना नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह शाळेवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल नामदेव आवकीरकर (वय 14) हा ठोसेघर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास तो क्लासला जाण्यापूर्वी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. त्याचवेळी त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

कुटुंबीयांनी तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचाराचे सर्व प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचवता आला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

स्वप्निल हा अभ्यासू, शांत आणि नम्र स्वभावाचा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. तो दररोज आपल्या मोठ्या भावासोबत साताऱ्यात क्लासला जात असे. क्लास पूर्ण झाल्यानंतर तो गावात परत येऊन नियमित शाळेत उपस्थित राहत होता.

शनिवारीही तो नेहमीप्रमाणे क्लासला जाण्याची तयारी करत होता. मात्र नियतीने त्याच्यावर काळाचा घाला घातला. एवढ्या लहान वयात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे ठोसेघर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शाळेतील शिक्षक, मित्र आणि ग्रामस्थांनी स्वप्निलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मीरा रोडवरील ठाकूर मॉलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, हिट अँड रन अपघात

मीरा रोडवर भीषण हिट अँड रन; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू, आरोपी फरार

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?