📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

कोल्हापूर हादरलं! चारित्र्याच्या संशयातून एसटी स्टँडवर पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या; आरोपी फरार

On: July 9, 2026 1:55 PM
आम्हाला फॉलो करा:
पेठवडगाव एसटी स्टँड परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या झाल्यानंतर पोलीस तपास करताना | Kolhapur Crime News

कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना एसटी स्टँड परिसरात घडली. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृत महिलेचे नाव अमृता दीपक कांबळे (वय 30) असे असून, आरोपी दीपक लाडू कांबळे (वय 35, रा. सावर्डे) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुली असून काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. अमृता कांबळे या एका वकिलाला भेटण्यासाठी पेठवडगाव एसटी स्टँडच्या मागील कॉम्प्लेक्समध्ये आल्या असताना आरोपी तेथे पोहोचला.

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या कोयत्याने अमृता यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हल्ला थांबवण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र, “ही माझी पत्नी आहे, मध्ये पडू नका,” असे म्हणत आरोपीने नागरिकांनाही धक्काबुक्की केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!