मतदान कर्तव्य
मतदाता, मतदारा
नको करू रे आळस
“मतदानाचे” कर्तव्य
करी होऊन सालस !!
करी होऊन सालस
नको करू टाळाटाळ
अरे मरू दे म्हातारी
सोकाऊ नये रे काळ !!
सोकाऊ नये रे काळ
माजू नये अराजकता
धावं धावं मतदारा
सजग होऊनि आता !!
सजग होऊनि आता
हो तू हुकुमाचा एक्का
लोकशाही वाचवीण्या
वाढवा मतदान टक्का !!
वाढवा मतदान टक्का
करुनीया मतदान
एक एक मतं असे
माझ्या देशाचा रे प्राण !!
माझ्या देशाचा रे प्राण
नको गद्दारी ना ईजा
खरा मालक देशाचा
तुचं मतदार राजा !!
तुचं मतदार राजा
सोड सोड रे आळस
“मतदानाचे” कर्तव्य
करी होऊन सालस !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.