करा मतदान
मत अनमोल । ठेवूनिया जाण ।
ठेवा जरा भान । क्षणोक्षणी ॥
ध्यानात ठेवू या । दिन मतदान ।
करू या सन्मान । लोकशाही ॥
मतदान दिनी । फक्त मतदान ।
नको मानपान । कशाचाच ॥
ऐकावे जनाचे । करावे मनाचे ।
न व्हावे कुणाचे । गुलामची ॥
वृद्ध असो युवा । या मत देऊन ।
राहील टिकून । लोकशाही ॥
टाळू नका कोणी । मतदान करा ।
लोकशाही करा । बळकट ॥
मतदानासाठी । करु या जागृती ।
जनता जाणती ।असावीच ॥
जागृत असावे । देताना हे मत ।
विकासाची वात । पेटणार ॥
– प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
(संत कबीर कविराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी)
रुक्मिणी नगर,अमरावती.
भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९