विठ्ठल..
कोटी चंद्र सूर्य।तैसे मुखी तेज।
विश्वंभर मज।भुलवितो।।
लावियतो वेड।राहुनिया उभा।
कुंडलाची प्रभा।काय वर्णू।।
कासे पितांबर।दिसते सुंदर।
देव सुरवर।आळविती।।
गळा वनमाळा।कस्तुरीचा टीळा।
विठ्ठल सावळा।शोभतसे।।
भजू आमरण।हरि मुखे म्हणू।
मोक्षाचा सुकाणू।पांडूरंग।।
–आबासाहेब कडू
९५११८४५८३७
कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशी-२०२३