पाहुणे हल्ली…
पाहुणे हल्ली
कुणी येतच नाहीत
आपलीच मुले पाहुण्यां
सारखी घरी येतात अन
निघून जी जातात
म्हातारे आई वडील मात्र
ते जाताना डोळे पुसत
पुन्हा लवकर येतील
ह्या आशेवर जगत राहतात
काळ भुर्रकन सरकत जातो
तसाच ह्यातील ही कुणीतरी
देवाघरी निघून जातो….
आता मात्र मागे जो उरतो
त्याची प्रचंड तडफड चालू होते
जिवंत पणे नरक यातना
जगातील सर्वात मोठी शिक्षा
काहीच गुन्हा नसताना
किती भयानक त्या वेदना…
म्हणून तर म्हणतोय
पोरानो वारंवार गावी जात जा ना…!
-अशोक पवार