म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावतोय.!
जामिनावर सुटलेल्या व्यक्तीने न्यायालयावर बोलू नये ! ह्या देशात संविधान सर्वात मोठं आहे. आणि ज्यांनी हे संविधान लिहल त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आरक्षण मराठा समाजाला गरजेचं असल्याचं म्हंटल आहे. बाकी राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी हे आज जे बरळत आहेत, ते बर जरी असल तरी, तुम्ही ज्या पक्षामूळे मंत्री आहात, त्या पक्षाला ह्या वेळी मराठा मात्र कात्रजचा घाट दाखवणार हे मात्र नक्की आहे. माणूस पाहून मतदान होणार.
तुम्ही मोठ्या जोशात बोलून गेला असाल पण लक्षात ठेवा त्यावेळी आणि आता परिस्थिती वेगळी आहे. पूर्वी मराठा एकजूट नव्हता आणि निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्व त्याच्या कडे नव्हतं. परंतु आता जरांगे पाटलासारख कणखर आणि बाणेदार नेतृत्व सरकारसमोर उभं असून त्याच्या पाठी सर्वसामान्य गरजवंत मराठा उभा आहे.
आजवर ज्यांनी सत्ता भोगली, मराठा असूनही मराठ्यांचे कधी झाले नाही. ते आजच्या व्यक्तव्यावर जर गप्प असतील तर इथून पुढे तुम्ही मराठा म्हणून उगाच छाती बडवत बसू नका ! उगाच डेंग्यू झालाय, त्यातून सावरा तुमच्या सहकारी मंडळींना ही आवरा नाहीतर हा मराठा त्यांच्या सकट तुमचा कार्यक्रम व्यवस्थित करत असतो..! त्यामुळे ठोस भूमिका घ्या एकतर मराठा आरक्षणाच्या बाजूने अथवा विरोधात. शेवटी तुमचा जवळचा माणूस जे बोलला तो तुमच्या परवानगी शिवाय बोलणार नाही हे ही कळत बर का…?
भाजप आणि फडणवीस यांना धारेवर धरण्यापेक्षा पहिल यांना जाब विचारलं पाहिजे आज एक बोलतय, उद्या दुसर ही उठेल . म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावतोय.!
-अशोक पवार