गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : मतदार नोंदणी अभियानाच्या जनजागृतीसाठी अमरावती विधानसभा मतदार संघ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून आज सकाळी रॅली सुरु झाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे प्राध्यापक व विद्यर्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. ही रॅली मालवीय चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, राजापेठ मार्गे भारतीय महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. रॅली दरम्यान समाजकार्य महाविद्यालय बडनेरा व ब्रिजलाल बियाणी सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदार नोंदणीचा संदेश दिला.