नानक आहुजा यांचा वाढदिवसानिमित्त डॉ.गोविंद कासट व प्रा.अरुण बुंदेले यांनी केला सत्कार
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : दैनिक वृत्तकेसरी आणि दैनिक प्रतिदिन अखबारचे संस्थापक संपादक मा.श्री नानकजी आहुजा आणि सौ.पूनमताई आहुजा यांचा वाढदिवसानिमित्त दि.८ ऑक्टोबर २०२३ ला त्यांच्या निवासस्थानी डॉ.गोविंद कासट मित्रमंडळी आणि कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे शाल,पुष्पगुच्छ,प्रा.बुंदेले लिखित “अभंग तरंग ” हा काव्यसंग्रह,श्री दीपक दारव्हेकर लिखित ” बाप माझा ” हे पुस्तक व श्री प्रवीण वासनिक यांच्याकडून बोधी वृक्ष भेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

प्रा.अरुण बुंदेले यांनी समाजसेवी डॉ.गोविंद कासट यांचा शाल,पुष्पगुच्छ व स्वलिखित ” अभंगतरंग ” हा काव्यसंग्रह भेट देऊन प्रतिष्ठानतर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार केला.याप्रसंगी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी मा.श्री नानक आहुजा यांच्या वाढदिवसानिमित्त ” मा.श्री नानक अहुजा ” या स्वरचित अभंगाचे व समाजसेवी डॉ.गोविंद कासट यांच्या वाढदिवसानिमित्त ” डॉ.गोविंद कासट ” या स्वरचित अभंगाचे सुमधुर आवाजात गायन केले.
याप्रसंगी समाजसेवी गोविंद कासट यांनी ” श्री नानकजी आहुजा यांनी दैनिक प्रतिदिन अखबार आणि दैनिक वृत्तकेसरी मधून विविध प्रकारचे समाजप्रबोधन करून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला आणि सत्य वार्ता समाजापर्यंत
पोहोचविली.”असे विचार व्यक्त केले.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी ,” मा.श्री नानकजी आहुजा यांनी दैनिक प्रतिदिन अखबार आणि दैनिक वृत्तकेसरीतून वाचन संस्कृती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.एक आदर्श संपादक म्हणून त्यांनी जे कार्य केले व करीत आहेत ते महत्त्वपूर्ण आहे.”असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी,क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी स्थापन केलेली पुण्याच्या भिडे वाड्यातील पहिली शाळा स्मारक व्हावे यासाठी झटून प्रयत्न करणारे,गाजर गवत निर्मूलन करणारे,हजारो बोधी वृक्षाचे वाटप करणारे श्री प्रवीण वासनिक,सेवानिवृत्त कलाशिक्षक व विविध संघटनेद्वारे सामाजिक कार्य करणारे श्री विनोद इंगोले यांनी वाढदिवसानिमित्त मा.श्री नानक आहुजा व डॉ.गोविंद कासट यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.