मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?
मुलांचा छातीत बसलेला घट्ट कफ कसा काढाल.?लहान मुलांना वयाच्या ५ ते ७ वर्षापर्यंत सतत सर्दी, कफ, खोकला, ताप असे काही ना काही होतच असते, धुळीची ॲलर्जी, विविध विषाणूजन्य समस्या, बदलते हवामान अशा कारणांनी मुलांना या समस्या उद्भवतात. काही वेळा हा कफ ठराविक काळाने बरा होतो. मात्र काही वेळा औषधोपचार आणि घरगुती उपाय करुनही हा घट्ट कफ छातीत तसाच राहतो. अशावेळी वाफारा, शेक देणे, गरम पाणी पिणे असे उपाय केल्यावर हळूहळू बरेच दिवसांनी यावर थोड्या प्रमाणात आराम मिळतो. पण या सगळ्या काळात मुलांची अजिबातच झोप होत नाही. कफ, सर्दी किंवा खोकला यामुळे त्यांना सतत जाग येत राहते आणि मग सलग झोप मिळत नाही. त्यांच्याबरोबरच आपल्याही झोपेचे खोबरे होते ते वेगळेदुसरीकडे कफामुळे अन्न जात नाही त्यामुळे अंगात ताकद राहत नाही. त्यात खेळणे सतत सुरू असल्याने थकवा येतो. असे सगळे झाले की मुलांच्या एकूणच आरोग्यावर त्याचा विपरी...








