Thursday, November 13

मी तंदुरस्त आहे का.?

मी तंदुरस्त आहे का.?
जमीनीवर हात न टेकता मला उठबस करता येते म्हणजे मी फिट आहे.. मी इंडीयन टॉयलेटमधे बसउठ करु शकते म्हणजे मी फिट आहे.. मी खाली बसुन कपडे धुवु शकते किवा भांडी खाली बसुन घासु शकते,  फरश्या घासु शकते , माझे हात खाली वाकल्यावर पायाला लागतात किवा डोकं गुडघ्याना लागतं म्हणजेच मला पोट नाही आणि मी फ्लेक्झीबल आहे असही होवु शकतं, कुठलही काम करताना माझं पोट मधे येत नाही आणि छोट्या कामाने थकायला होत नाही म्हणजे मी फिट आहे.. यातलं कोणाकोणाला काय काय जमतं पहा कारण आपण सगळे मिसयुनीव्हर्स होणार नाहीत पण मिस हेल्दी ,मिसॲक्टीव्ह , मिसॲट्रॅक्टीव्ह , मिसप्रमाणबध्द, मिस उत्तम बायको, उत्तम आई या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात गरजेच्या आहेत.
 हातात मोबाईल घेउन बसुन कोणीही फिट रहाणार नाही तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, तोंडावर ताबा हवा आणि काय कधी किती खावं याचा अभ्यास हवा, प्रत्येक माणसाची हेल्थ,कामाची पध्दत , आणि कुठल्या हवामानात ती व्यक्ती रहाते यानुसार डाएट बदलतं. माणुस जसा आपोआप जाड होत नाही तसाच तो आपोआप बारीकही होत नाही. मला फराळ करायला वेळ मिळाला मग व्यायामाला का मिळु नये ?
मला शॉपिंगला वेळ मिळाला मग व्यायामाला का मिळु नये ?
मी पार्टीला गेटटुगेदरला जाऊ शकते तर व्यायाम का करु शकत नाही ? मी अनेक कामे करते पण व्यायामाला वेळ का नाही? हे प्रश्न प्रत्येकाने आपल्यालाच विचारायचे आहेत कारण योग्य उत्तर आपल्याकडेच मिळेल. फक्त आणि फक्त आळस हेच याचं उत्तर आणि शरीर फुकट मिळालय त्याची किम्मत नाही हीच याची उत्तरे आहेत. Nothing is impossible हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. Be happy and healthy forever.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे निरोगी मन,  सुंदर विचार..

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply