Monday, October 27

Tag: Article

फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज.!
Article

फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज.!

फासेपारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज.!  पारधी हे एका आदिवासी जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत आहे.आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांनादिसतात.समाजाकडू न दुर्लक्षित राहिलेला हा समाज आजही परंपरागत शिकार करून आपली गुजराण करत आहे.त्यांना शिक्षणाचा गंध नाही..शिक्षणा अभावी योग्य अयोग्य,चांगल वाईट त्यांना कळत नाही.सरकारद्वारे ज्या योजना आखण्यात  येतात त्या त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही..त्यामुळे या समाजाला विकास योजनांचा फायदा होत नाही.या जमातीच्या विकासाच्या योजनांचा फायदा या संवर्गातील इतर समूहांना होत असून हा समाज अजूनही विकासापासून व समाजाच्या मुख्य प्रवाहा पासून फार दुर आहे..शिक्षणा अभावी त्यांचे राहणीमान गलिच्छ असल्यामुळे त्यांना रोजगार व नोकरी मिळत ...
नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! 
Article

नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! 

नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! उद्या १ जानेवारी २०२४, नव्या वर्षाची सुरुवात .... *“रोज नवा सूर्य उगवतो, रोज नवे वर्ष आहे. आठवणीच्या हिंदोळ्यावर, रोज नवा हर्ष आहे. रोज नवा चंद्र उगवतो रोज नवी रात आहे. आभाळातल्या चांदण्यांवर, रोज नवी बात आहे.”* पुस्तकाचे पाने उलटवावी तशी आयुष्याची पाने उलटत जातात, प्रत्येक दिवस रोज नव्या विचारांची मैफिल घेऊन येत असतो. आला दिवस गेला या प्रमाणे जीवनमान मागे पडत चालले आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत चालला आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. जसजसा काळ बदलला तस तसे जीवनमान बदलत चालले आहे. राहणीमान, खानपान, दळणवळण, संपर्क, गाठीभेटी, सण यात अमुलाग्र बदल होत चालला आहे. या धकाधकीच्या जीवनात एकमेकाकडे बघायला कुणाला वेळ राहिला नाही. घड्याळाच्या काट्याप्रमाणे मानव पळतो आहे. “फक्त कॅलेंडरचे पान बदलत आहे, मात्र दैनंदिन अडीअडचणी तशाच आहेत.”आपण स्वतःमध्ये झाकून ...
Article

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य?

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य? नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू असते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा असतो असं म्हणायला हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कटू-गोड आठवणींची सोबत असते. हे वर्ष खूप काही देऊन आणि शिकवून जाते. त्यामुळे हे सरतं वर्ष अनेक प्रकारे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरते. याच आश्चर्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जाते. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक असतो, तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवी उमेद देणारा ठरतो. पण...       ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती जडभरीत वस्त्रांनी आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांनी नटून-थटून चारचौघात गेल्यावर त्याला कुणीही नवं तर म्हणणार नाही ना! एवढच का जोपर्यंत त्याच्या शरीरावर जडभरीत वस्त्र व प्रसाधनं असते, तोपर्यंत तो थोडा वेगळा वाटतो. ते सर्व उतरल्यावर 'जुनं ते सोनंच...
कौटुंबिक न्यायालयातील दिलेत दहा सल्ले !
Article

कौटुंबिक न्यायालयातील दिलेत दहा सल्ले !

कौटुंबिक न्यायालयातील दिलेले दहा सल्ले ! १) तुमच्या बरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका, उलट, त्यांना नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्या मध्ये जितके अंतर असेल तितके तुमचे नाते चांगले राहील.२) तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे. हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रीणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो. पण सुनेचे तसे नसते. मुलावर रागवता म्हणून सुनेवर रागावला तर ती कायम लक्षात ठेवते. खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागावू शकते किंवा चुका सुधारू शकते.३) तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणे ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे...
बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !
Article

बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !

बेरोजगारी वाढतेय मात्र कामाला माणसं नाहीत !खुशियों का कल ढूंढना होगा, बेरोजगारी का हल ढूंढना होगा,संसदेत २ तरुणांनी घुसखोरी केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. घडलेला प्रकार खूप विचित्र, दहशत पसरविणारा असाच होता. घटना कोणतीही असो, दोनही बाजूने अर्थात घटनेचे समर्थन करणारे आणि घटनेच्या विरोधात बोलणारे, प्रतिक्रिया देणारे असतात. संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोपी  तरुण-तरुणी यांचे बाबतीत बोलतांना काँग्रेस नेते माजी खासदार मा. राहुलजी गांधी यांनी ‘देशात बेरोजगारी हा मोठा मुद्दा असून बेरोजगारीतून या तरुण-तरुणींनी असे कृत्य केले’, असे म्हटले. मात्र हा राजकीय भाग झाला. सरकार विरुध्द कोणत्याही घटना व प्रकाराचे, आंदोलनाचे सरासरी समर्थन करणे, हीच विरोधी पक्षाची भूमिका असते, असो..भारतातील बेरोजगारीचा दर जानेवारी २०२३ मध्ये ७.१४ टक्के होता, तो पेâब्रुवारी २०२३ मध्ये ७.४५ टक्के तर जुलै २०२३ मध्ये  ...
Osteoarthritis : संधिवात 
Article

Osteoarthritis : संधिवात 

Osteoarthritis : संधिवात बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना आहे. संधिवातमध्ये सांध्यांच्या ठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असते. त्यामुळेच या त्रासाला सांधेदुखी असेही म्हणतात. सांधेदुखी कशामुळे होते, त्याची लक्षणे आणि संधिवात वरील उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात सांगितली आहे.दोन हाडे एकत्र येऊन सांधे किंवा joints बनत असते. सांध्यांची हालचाल होताना तेथे असलेली दोन हाडे एकमेकांना घासू नयेत यासाठी तेथे कार्टीलेज नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे हाडे एकमेकांना न घासता सहजरीत्या सांध्याची हालचाल होत असते. मात्र जेंव्हा काही कारणांनी सांध्यातील कार्टीलेजची झीज होते तेंव्हा दोन्ही हाडे एकमेकांना घासू लागतात. अशावेळी तेथे सूज येणे, वेदना होणे, सांध्याची हालचाल योग्यरीत्या न होणे असे त्रास होऊ लागतात. या त्रासाला संधिवात असे म्हणतात.तसे पाहिले तर, संधिवा...
जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 
Article

जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 

जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे ◆ टॉमेटो मध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं.◆ स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं.◆ चेरी मध्ये आढळून येणारं एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.◆ लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात.◆ बीट मध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन-सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.◆ डाळिंब मध्ये असणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत करतात.◆ सफरचंद मध्ये असणारी अ‍ॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृ...
Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’
Article

Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’

Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – 'ध्येयवेडा डॉक्टर'मानसशास्त्र  Psychology सायकॉलॉजी – मानवी मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्र म्हणजे मानसशास्र. जर्मन तत्वज्ञानी  रुडॉल्फ गॉकेल १६व्या शतकात हा इंग्रजी शब्द आणला. Psyche साईक' (मन)' आणि Logus लोगस (शास्त्र) यापासून हा शब्द तयार झाला. थोडक्यात या शब्दाचा ग्रीक  भाषेत अर्थ आत्म्याचे शास्त्र.मानवी वर्तनाचा केलेला अभ्यास तसा सोपा नाही. व्यक्तिगणिक त्यात वैविध्यता दिसून येते. पिंड पिंड मतिर्भिन्ना या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आयक्यू वेगवेगळा असतो त्यानुसार त्याचे वर्तन बदलत असते. या वर्तनाचा अभ्यास करतांना विविध प्राण्यांवर आधी प्रयोग करावे लागतात त्यानुसार त्यांनी कारणमीमांसा कळत असते. इतरांच्या मनाचा अभ्यास करून त्याच्या मनातले काढून त्याला आपल्या मनाच्या प्रवाहात आणणे हे एक कौशल्य असते. असे कौशल्य कुणालाही जमत नाही. त्यासाठ...
पारावरच्या गप्पा….!
Article

पारावरच्या गप्पा….!

पारावरच्या गप्पा....!खालच्या आळी चा दादा" देवळा समोर बसलेल्या पोरांना काय तरी सांगत व्हता. लांबून ऐकू येईना म्हणून , जवळ जाऊन ऐकाव म्हणून आप्पा "देवळा जवळ आला.आप्पा काही झालं तरी इरोधी पार्टीचा. त्यामुळं त्याला दादा नेमकं काय बोलतोय हे जाणून घ्यायला  आप्पाला मोकर उत्सुकता.आता दादा म्हंजी मोठी आसामी त्यात गावातल सरपंच पद राखीव असल्यामुळे  उपसरपंच पद दादा कड व्हत. पांढरी फॅक कापड . उंची बी चांगली शरीर पण धडधाकट , म्हणतात ना टक्कलम कवचितच दारिद्रम...अगदी तसच डोक्यार टक्कल , पण हुशार आणि लै अक्कल असल्या मुळे  दादा  गावगड्यात नेहमी पुढंअसणार .शिवाय दादा चा चुलता,म्हंजी नुसतं गावात नाय तर तालुक्यात गाजलेला  कोणाच्या ही हातात न आलेला पैलवान. पण दादा नि त्या चुलत्याला सुद्धा चित करून ,असा डाव टाकला की ईचारु नका...!दादा पोरांना म्हणत व्हता शिकून कोणाच भल झालं हाय तव्हा ! माह्या कड बघा मी किती...
शेतकऱ्यांचे  गाडगेबाबा…
Article

शेतकऱ्यांचे  गाडगेबाबा…

शेतकऱ्यांचे  गाडगेबाबा...संत गाडगेबाबानी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत प्रचंड योगदान दिले आहे.त्यांची सामाजिक क्रांती अनुयायांनी खराट्यात बंदिस्त केली. त्यामुळे त्यांनी दिलेली सामाजिक क्रांतीची हाक ऐकण्यात महाराष्ट्र अपयशी ठरला.त्यांच्या आंदोलनास वेगवेगळे  क्रांतिकारी पदर आहेत. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील महाभयानक अन् तितक्याच क्रूर टोळ्यांना त्यांनी आपल्या प्रखर वाणी अन् कृतीतून उध्वस्त केले. संत गाडगेबाबांनी ज्या वर्गासाठी लढाई उभी केली तो वर्ग इथला कृषक अर्थात शेतकरी वर्गच होता. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगात शेतकऱ्यांविषयी जो कळवळा होता तोच कळवळा संत गाडगेबाबांच्या मांडणीत दिसून येतो. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीचे आंदोलन होते.शेतकरी शहाणा व्हावा, तो धार्मिक अन् आर्थिक शोषकांच्या तावडीत सापडू नये यासाठीच संत गाडगेबाबांनी ...