Monday, October 20

Tag: Article

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!
Article

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!

मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहे, त्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला 'फॉरेस्ट फायर' म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो.myupchar.com के डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो, शिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत.डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचारमोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस ...
अशी घ्या गरोदरपणात काळजी
Article

अशी घ्या गरोदरपणात काळजी

अशी घ्या गरोदरपणात काळजी कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे मुख्य कारण गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर योग्य ती काळजी घेतलेली नसणे तसेच जन्माअगोदर आणि जन्मानंतर बालकाचे स्वास्थ्य चांगले असण्यासाठी गरोदर मातेने आपल्या बाळाची काळजी गरोदर असल्यापासून घेणे आवश्यक असते. बाळाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी गरोदर मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणातील काळजी बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी 16 ते 18...
जत्रा.!
Article

जत्रा.!

जत्रा.!कार्तिक महिना उजाडला म्हणजे गावाकडं चांगली कडाक्याची थंडी पडायची.सगळीकडे गारठा जाणवायचा. लोकांची गहू हरभरा रब्बीची पेरणी सुरू व्हायची.कापसाचं शितादही पूजन करून, सगळीकडे दहीभाताचं बोणं शिंपडून चांगल्या पीकाची आशा केली जायची. वेचणाऱ्या बाया सांगुन पहिला नवा वेचा काढल्या जायचा. शेतकऱ्यांच्या या पहिल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत केल्या जायचं. शेतात खाण्या लायक अंबाडीची भाजी, बारीक टमाटी, वायकं,शेंगा, भेंडी,गवारांच्या शेंगा,बरबटीच्या शेंगा खायला व भाजीला भरपूर उपलब्ध असायचं.आमचे आबा शेतात गेली म्हणजे धोतराच्या घोयात भरपूर काकड्या,वायकं,बोरं,चिंचा काहीना काही खायला हमखास आणायचे. सग्या, सोयऱ्यांनाही उडीद, भुईमूग, सुर्यफुलाचे बिया नवं म्हणून पायली भर सोबत बांधून द्यायचे. आदानप्रदान संस्कृती होती. पोरीच्या घरी बाप रिकाम्या हातानं कधी जायचा नाही.नवीन निघालेले काही ना काही सोबत लेकीकड...
बुलबुलवाले  युसुफभाई.!
Article

बुलबुलवाले युसुफभाई.!

बुलबुलवाले युसुफभाई.!शहरात गतकाळात एक बँड ग्रुप चांगलाच फेमस होता. काळाच्या ओघात मागील दोन दशकांत लहान मोठे बँड मोठ्या संख्येत बंद पडले. यात कामाला असणाऱ्या कलाकारांपैकी अनेकांनी आपला व्यवसाय बदलला. त्यांना चरितार्थाची सोय जमली. मात्र ज्यांची उमर या पेशात ढळून गेली होती त्यांना परिवर्तन करण्याची संधी मिळाली नाही. मिळेल ते काम करत राहणे त्यांच्या नशिबी आलेलं. युसुफभाई त्यातलेच एक. ते अगदी उत्तमरित्या बुलबुल / बँजो वाजवत. काही वर्षापूर्वी त्यांचा बँड बंद पडला असला तरी त्यांची कला जिवंत होती. कुणीही बोलवलं तरी ते हजर होत! पैसे मिळाले नाही तरी चालेल मात्र आपला हात हलता राहिला पाहिजे ही त्या भल्या माणसाची विचारसरणी!कालांतराने ते सद्यकालिन संगीताच्या मागे पडत गेले. त्यांना ज्या ट्यून्स यायच्या त्याची फर्माईश कुणीच करत नसे. नव्या पिढीच्या झिंगंत नाचणाऱ्या पोरांना जी गाणी आवडत ती त्यांना बँजोव...
आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले
Article

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले(राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.! त्यानिमित्ताने हा लेख 'भारताचे महानायक महानायिका' पुस्तकातून देत आहे.-  लेखक:रामेश्वर तिरमुखे,जालना 9420705653.- संपादक)महात्मा जोतीराव फुले हे महान क्रांतिकारक होते.जी क्रांती त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्रनिर्माण,जी क्रांती सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक सह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती.जोतीराव फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला.त्यांच्या आई चिमनाबाई तर वडील गोविंदराव होत. जोतीराव रांगत असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.सगुणाबाई क्षीरसागर या मावस बहिणीने जोतीराव यांचा सांभाळ करण्यासाठी मदत केली होती.गोविंदराव शेती आणि फुलांचा व्यवसाय करत होते. वयाच्या 7व्या वर्षी जोतीराव यांना...
पांगलेला गाव.!
Article

पांगलेला गाव.!

पांगलेला गाव.!नदी काठावरून दुरवर नजर जाईल जिकडे तिकडे हायब्रीडच हायब्रीड पेरलेली हिरवीगार शेतं.नदीकाठच्या डबक्या, डबक्यात साचलेल्या पाण्यावर ऑईल इंजिन बसवून वांग्याची ,टमाटयाची हिरवीगार डुंगे बहरलेली दिसायची.तयार होवून निंघालेली वांगी टमाटी विकायसाठी गावच्या आठवडी बजारात शेतकरी लोकं मांडायची.गावात पिक पाणी तसं चांगलं होतं.चांगली आबादानी होती. जो तो आपल्या मेहनतीत व्यस्त रहायचा. शेणपाणी आटपून रंगरावनं गोठ्यातील बैल मोकये सोडून त्याईच्या पाठीवर दोर टाकले. बैलांनी पाणी प्याले सरका नदीचा मार्ग धरले‌ला. बादशाहा भाईच्या नदीपल्याडच्या मईच्या वावरात आज हायब्रीडच्या वावरात डवऱ्याचा फेर होता.कायाभोर मईच्या वावरात कायभोर हायब्रीड चांगलं टोंग्या,मांड्या,बसलं होतं. वावरंही तसं ताकदचं म्हणजे हेल्याचं मस्तकच होतं.साजरं शेणखत व पुराच्या पाण्यामुळे येणारा सुपीक गायवटी भाग असल्यानं व घरच्याच दहा बारा बै...
सप्रेम नमस्कार.!
Article

सप्रेम नमस्कार.!

सप्रेम नमस्कार.!                       खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे एक सोहळा असतो, हे आता दिसून येऊ लागलं असून लोकसभेपेक्षा ही जास्त हा विधानसभेचा निवडणूक सोहळा रंगतदार होणार अस दिसत आहे.मतदार राजा आणि जनतेच्या हिताचे इतके निर्णय धडाधड होत आहेत,की  हे पाहून अस वाटत हेच मुख्यमंत्री"उपमुख्यमंत्री होते की नवीन आलेत. किती धाडसी निर्णय घेत आहेत नाही का ? चीफ तर नाही ना यांच्या मध्ये बसवली धाडसी निर्णय घेण्याची.            तोल जाऊ पर्यंत जनता ओरडून थकली परंतु टोल बंद झाले नाही.परंतु निवडणूक आली असता  न मागता मुंबईत जाणारे  टोल माफ. आणि नवीन किती तरी महामंडळे स्थापन वाह काय वेग पकडलाय नाही सरकारने .खऱ्या अर्थाने गतिमान सरकार  झालंय.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!          इथून मागेच हे निर्णय घेतले असते तर खूप बरं झालं असत . बाकी मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला ते काम मात्...
शाहिरी अभंग गाते.!
Article

शाहिरी अभंग गाते.!

शाहिरी अभंग गाते.!        छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली. स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे. त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला.                रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशा...
दिवस आपल्यासाठी उगवतोच.!
Article

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!     मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.तो आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.जणू पैलवानच.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.आणि पोरं त्याच्या गुडघ्याला.अंगाने दणकट असणारा नाना.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.     त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं.आणि त्याचा परिणा...
एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!
Article

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!या एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.मला आणि माझ्या कवितेला ही एस.टी.आमच्या आयुष्याला फार जवळची झाली आहे. महाराष्ट्रभर याच एस.टी.ने मी हिंडत असतो. प्रवासात सगळी सर्व सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. थोडंस सोशल मीडियामुळे मला बरीच सामान्य लोकं ओळखू लागल्यामुळे अनेकजण मी एस.टी.मध्ये किंवा स्टँडवर दिसलो की माझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात. कुणी चहा पाजतात. तर कुणी काहीतरी खायला हमखास देतात. याच एस.टी. मध्ये सामान्य लोकांची वेदना समजून घेता येते. मला वाटतं सगळ्या जाती धर्माची माणसं या एस.टी मध्ये भेटतात. पण, खरं सांगू का? या डब्यात फक्त आणि फक्त माणुसकीचा सुगंध दरवळत असतो. बसायला जागा भेटावी, भेटली तर खिडकीजवळ भेटावी या हट्टाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर इथं भांडण होत नाही.ज्याला आधी जागा भेटलेली असते नंतर तोच प्रवासी उभ्या ...