लोकशाहीचा सूर्य
लोकशाहीच्या आडून
राजदंडाची निर्मिती केली
म्हणून
तुझा जयजयकार होणार नाही..
गुलाम भक्त तुझा जयजयकार करू शकतील ..
पण खरे भारतवासी जयजयकार
करू शकणार नाही..
लोकशाही मरताना आम्ही
उत्साह साजरा करू शकत नाही..
सेंगोल इमारतीत लावल्याने
एका राजेशाहीची निर्मिती झाली
असं वाटतं तरी
आमची येणारे पिढी
तुमचे कटकारस्थानने
उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही..
कारण
माझ्या देशातील तरुणावर
माझा शंभर टक्के विश्वास आहे..
धर्माची नशापासून
लोकशाहीचा सूर्य उगवण्याचा थांबत नाही ..
लोकशाही जळत असताना लोटांगण
घालून खरा भारतवासी होऊ शकत
नाही..
कारण
खरा भारतवासी
हा लोकशाहीच्या
मुळाला उध्वस्त करत नाही ..
पहा रे पहा
भारतीय तरुणांनी मशाल
हाती घेतली आहे
आगकाडी तेवढी लावा
अमानुषतेच्या गढीला
जाळून भष्म करा ..
भारताची एकात्मता टिकवून ठेवा..
– संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००