सेवाभाया……
तुम्ही सेवभाया । आमचे तारक ।
विकार नाशक । गुरूराया ।।
दिली दुरदृष्टी । जपून संस्कृती ।
जाहली विकृती । नष्ट सारी ।।
तुम्ही खरे वैद्य । तुम्ही खरे संत ।
माझे भगवंत । सेवाभाया ।।
निसर्ग रक्षक । विज्ञान पोषक ।
तुमचे प्रेरक । सुविचार ।।
तुम्ही शूरवीर । तुम्ही ब्रम्हचारी ।
नेहमी तयारी । लढण्याची ।।
गोरक्षक तुम्ही । तुम्ही कनवाळू ।
तुम्हीच कृपाळू । भगवंत ।।
अमर तुमची । भविष्याची वाणी ।
बहुमोल पाणी । आज आहे ।।
दशदिशा कीर्ती । भव्यदिव्य मूर्ती ।
तुम्हांमुळे स्फूर्ती । आमच्यात ।।
अजू लोटांगण । तुम्हांस घालतो ।
तुम्हांस वंदतो । सेवाभाया ।।
– शब्दसखा – अजय रमेश चव्हाण
तरनोळी, ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७