शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन
गौरव प्रकाशन मुर्तिजापूर (प्रतिनिधी): चिखली कादवी मुर्तिजापूर येथील येथील प्रतिष्ठित नागरिक शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रकलाबाई, मुलगा पवन, स्नुषा सौ.जयश्री, नातवंडं असा आप्त परिवार आहे.
काल स्थानिक स्मशानभूमी येथे त्यांचेवर प्रा. नारायण राऊत, राजू तायडे, व मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.