आमचं हाप तिकीट..!
साठी झाली नाठी म्हणते
फाटक्यात घालते पाय
आमचं हाप तिकीट म्हणते
म्हतारा कामाचा नाय !!
मायल्योक म्हनतेत मले
काहीच समजत नाय
बजारहाट देव जत्रा
हाफ तिकिटात करते माय !!
तोरणं असो वा मरण
पुढे पुढे करती ही बाय
रोज एस्टीत बसल्या बीना
हिलाच करमत नाय !!
माहेर हिच्यासाठी आता
रोज घर आंगण झालं
हाफ तिकिटानं संसाराचं
माह्य इचकाइंधन केलं !!
“हाफतिकीट महिला मंडळ”
पाटी लागली माह्या दारी
माह्याच घरून पंढरीची
निघते पंधरवाडी वारी !!
लेकीं, सुनां, माय, बहिणीं
घेऊनी धावते लालपरी
सुख दुःखात धाव घेई
गावं खेड्यात देवापरि !!
सासू सून खुस्समखूस
घरात नाही किटकिट
दगडा पेक्षा मऊ मऊ
भाऊ झाली गा आता ईट !!
पालखीत त्यांचे पाय आता
लय न्याराच त्यांचा थाट
हाफतिकिटान सोपी झाली
सासर,माहेराची वाट !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556