📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास उशीर का? – प्रकाश आंबेडकरांचा सरकारला थेट सवाल

On: October 1, 2025 4:46 PM
आम्हाला फॉलो करा:
प्रकाश आंबेडकर अकोला येथील पत्रकार परिषदेत ओल्या दुष्काळावर सरकारवर टीका करताना
प्रकाश आंबेडकर अकोला येथील पत्रकार परिषदेत ओल्या दुष्काळावर सरकारवर टीका करताना

अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही “ओला दुष्काळ” जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.

आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी की नाही, यावर सरकारच्या निर्णयाचा खेळ सुरू आहे. सर्वेक्षणही झालेले नाही, आकडेवारी गोळा झालेली नाही, मग शेतकऱ्यांना दिलासा नेमका कधी मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्यांच्या या विधानातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित झाली.

फक्त सरकारवरच नव्हे तर इतर राजकीय पक्षांवरही प्रकाश आंबेडकरांनी घणाघाती टीका केली. सातबारा कोरा करण्याची आणि कर्जमाफीची मागणी पुन्हा जोर धरत असताना, आंबेडकरांनी पक्षपाती राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आज कर्जमाफीची मागणी करणारे, ते मुख्यमंत्री असताना काय करत होते?” असा सवाल उपस्थित करून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबतही स्पष्ट संकेत दिले. आंबेडकर म्हणाले, “भाजपला सोडून इतर कोणासोबतही स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली आहे. महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना असो वा अजित पवारांचा राष्ट्रवादी गट, त्यांच्यासोबतही आम्हाला हरकत नाही.” या वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पुढील राजकीय धोरणाबाबत उत्सुकता वाढली आहे.

आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदना आणि असंतोष बाहेर पडला आहे. नुकसान झालेला शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. पिकं गेली, कर्जाचा डोंगर वाढला, आणि आता मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना “ओला दुष्काळ” जाहीर होण्याचीच वाट बघावी लागत आहे.

सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मदत जाहीर करावी, अन्यथा ग्रामीण भागातून सरकारविरोधात रोष उसळण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

कार आणि बाईक विमा क्लेमवर कडक तपासणी आणि बनावट विमा फसवणुकीविरोधातील कारवाई

कार-बाईक मालकांनो सावधान! बनावट विमा क्लेमवर आता कडक नजर; इन्शुरन्स कंपन्यांचा मोठा निर्णय.!

दूध भेसळखोरांवर मोक्का कारवाईच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना

दूध-खाद्यपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना मोठा इशारा! मोक्का कारवाईच्या सूचनेने भेसळखोरांचे धाबे दणाणले.!

कर्जतच्या कोंदिवडे गावात छत्रीचा माईक घेऊन रस्त्यांची पाहणी करणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनी

छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या ‘रिपोर्टर’; कर्जतच्या रस्त्यांची अशी केली पोलखोल.!

पनवेल एसटी आगारात रील बनवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले एसटी कर्मचारी

प्रसिद्धीच्या नादात नोकरी धोक्यात! ST आगारात रील बनवणाऱ्या तिघांवर निलंबनाची कारवाई.!

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत दारव्हा तालुका प्रतिनिधी खुबराम चव्हाण आणि दारव्हा शहर प्रतिनिधी शशिकांत रोडगे यांची नियुक्ती करताना पदाधिकारी.

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत मोठ्या नियुक्त्या; खुबराम चव्हाण, शशिकांत रोडगे यांची निवड

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती