टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोवकेश्वर येथील कवयित्री सौ .मंजुश्री शिवाजी वाळुंज यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी दि २३ एप्रिल २०२३ रोजी काव्यलेखन स्पर्धेत लक्षवेधी क्रमांकाने माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवाडी केंद्र.-कर्जुले हर्या ता.-पारनेर, जि.- अहमदनगर येथे कार्यरत आहेत.
दि २३.०४.२०२३ रोजी राहता जि अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचा शताब्दी महोत्सव व कृतज्ञता सन्मान सोहळा २०२३ संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील काही कवयित्रींना काव्यलेखन स्पर्धेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मंचावर सहकार मंत्री मा अतुलजी सावे, पालकमंत्री मा राधाकृष्ण विखे पाटील, माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील उपस्थित होते .
महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघ, शाखा अहमदनगर , गुरुमाऊली मंडळ व जिल्हा कला साहित्य संघ व जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने दि ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय महिला काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेत सौ नाव.- मंजुश्री शिवाजी वाळुंज जि.प.प्रा.शाळा गोडसेवाडी,केंद्र.कर्जुले हर्या ता.पारनेर,जि.अहमदनगर यांना लक्षवेधी क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण येवला जि नाशिक येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रशांत वाघ यांनी केले होते.
यावेळी कला साहित्य शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा शिक्षक बॅंकचे संचालक मा.बापू साहेब तांबे, कारभारी बाबर, ओंकार प्रॉडक्शन, निर्माता दिग्दर्शक मा राजेंद्र पोटे प्राथ. शिक्षक , मा. अशोक कळमकर , मा बाळासाहेब बोरुडे, कार्यालयीन चिटणीस शिक्षक संघ , पारनेरचे मा अनिल इकडे
यावेळी अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे सर्व पदाधिकारी, तसेच मा संजयजी पठाडे, मा कारभारी बाबर, मा गणेशजी भोसले, पारनेर साहित्य साधना मंच समुहाचे सर्व सदस्य आदींनी अभिनंदन केले.