पारनेर (प्रतिनिधी): सगळ्या राज्यभरातून ज्या बाजारसमितीवर लक्ष लागून राहील होत ती बाजारसमिती म्हणजे पारनेर कृषि उपन्न बाजार समिती, तिचा निकाल हाती आला असून खा. विखे यांची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचं दिसून येत आहे..! महाविकास आघाडी ची गाडी मात्र दमदार घोडदौड करताना दिसत आहे. १८/० असा जिव्हारी लागणारा पराभव भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या वाट्याला आला आहे.
तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलवणारी घटना म्हणजे माजी आमदार विजयराव औटी आणि आमदार निलेश लकें यांचं मनोमिलन. गुरू आणि शिष्य एकत्र आल्याने तालुक्यातील राजकारण पूर्ण बदललं असून भविष्यात बदलत्या राजकीय समिकरणानुसार येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद, निवडणुकापाठोपाठ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची ही रंगीत तालीम म्हणून ह्या निवडणुकाकडे पाहिलं होत. यात किमान तालुक्यात तरी आघाडी बाजी मारताना दिसत आहे. ज्या यंत्रणेवर खा.विखे यांचा भरवसा होता तीच यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचं सर्वत्र दिसून येत आहे.
माजी आमदार विजय औटी आणि आमदार लकें यांनी निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा केली असता खा. विखे यांनी जास्त लक्ष पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत घातल्यामुळे व औटी यांच्यावर टीका केल्यामुळे औटी आणि आमदार लकें यांनीही टीकेला उत्तर तर दिलं होतच परंतु त्याही पेक्षा सचिन तेंडुलकरसारख जास्त न बोलता प्रत्यक्षात कृतीतून दाखवून द्यायचं, आणि मग तोंड गप्प करायचं हा नियम कसोशीने पाळला. ह्या बाजार समिती निवडणुकीच्या सामन्यात दमदार विजय मिळवून खा. विखे यांच्या गोलनदाजीवर अफलातून धोनीचा हेलिकॉप्टर शॉट सारखा फटका मारून १८/० करत दमदार विजय साजरा केला. भविष्यात लोकसभेला निलेश लकें नावाचा दमदार अष्टपैलू खा. विखे यांच्या समोर उभा असणार आहे. अष्टपैलू असल्यामुळे लकें यांची कोणती बाजू काम करून जाईल हे विखे यांच्या यंत्रणेला शोधन कठीण जाणार आहे. त्यामुळे हा पराभव तालुक्यातील भाजपपेक्षा खा. विखे यांच्या जिव्हारी लागणारा आहे.
माजी आमदार नंदकुमार झावरे हे विखे समर्थक असल्यामुळे राहुल झावरे नेमकी कोणती भूमिका घेणार.? हा प्रश्न पडला असता त्यानीही महाविकास आघाडी साठी काम केलं असल्यामुळे बऱ्यापैकी आघाडी मजबूत झाली होती. बाजार समिती निवडणुकीत आमदार लकें यांची शान वाढवण्यासाठी त्याच्या साठी जीवाच राण करणारे पोटघन, मेजर, सतीश भालेकर, संदीप चौधरी, सचिन पठारे यांची तालुक्यातील यंत्रणा विखे यांच्या यंत्रणेला सरस ठरली असल्याची चर्चाही तालुक्यात जोरदार रंगत आहे. जोडलेला प्रत्येक माणूस टिकवून ठेवणे ही आमदार लकें यांची खासियत असून हा मोठा विजय त्यामुळेच झाला अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
विजयासाठी आमदार लकें आणि सर्व निवडुन आलेल्या
नवनिर्वाचित सदस्यांना राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन ही केलं त्याच बरोबर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी चांगलं काम करा, योजनेची माहिती त्यांच्यापर्यत पोचवत चला. असा आदेश ही अजितदादा यांनी दिला आहे.