📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

रेल्वेचा ‘सुहागरात’ 1AC कोच वादात! व्हिडिओ व्हायरल होताच टीटीई निलंबित

On: July 9, 2026 5:12 PM
आम्हाला फॉलो करा:
रेल्वेच्या 1AC कोचमध्ये हनिमूनसारखी सजावट केल्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर रेल्वेची कारवाई

मुंबई | प्रतिनिधी

भारतीय रेल्वेच्या 1AC डब्यात हनिमून रूमसारखी सजावट करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित तिकीट तपासनीस (टीटीई) यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जुलै 2026 रोजी धावणाऱ्या 11002 नंदीग्राम एक्सप्रेसच्या 1AC कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने आपला प्रवास खास बनवण्यासाठी संपूर्ण केबिनची फुलांनी आणि सजावटीच्या साहित्याने हनिमून रूमप्रमाणे सजावट करून घेतली होती.

ही सजावट करण्यासाठी संबंधित प्रवाशांनी ऑनलाइन एका खासगी डेकोरेशन सेवा पुरवणाऱ्याशी संपर्क साधला. संबंधित डेकोरेटरला रेल्वेच्या डब्यात प्रवेश देण्यात आला आणि त्याने केबिन सजवली. याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली.

रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तीला रेल्वेच्या डब्यात प्रवेश दिल्याचे समोर आले. याला सुरक्षा नियमांचे उल्लंघन मानत संबंधित टीटीईला तात्काळ निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रवाशांना सजावट करता येते का?

रेल्वेच्या माहितीनुसार, एखाद्या प्रवाशाने संपूर्ण केबिन आरक्षित केली असल्यास तो आपल्या पसंतीनुसार सजावट करू शकतो. मात्र, त्यासाठी बाहेरील व्यक्तीला रेल्वे प्रशासनाच्या परवानगीशिवाय डब्यात प्रवेश देणे नियमबाह्य आहे. याच कारणामुळे या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, सुरक्षा नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही आणि अशा घटनांवर कठोर कारवाई सुरू राहील.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मीरा रोडवरील ठाकूर मॉलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, हिट अँड रन अपघात

मीरा रोडवर भीषण हिट अँड रन; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू, आरोपी फरार

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना

मी रील स्टार की रिअल स्टार? मुंबईकरच निर्णय घेतील; महापौर ऋतु तावडे यांचा विरोधकांना जोरदार टोला

रुग्णालयात आजारी चिमुकल्याला भेटताना अरिजित सिंग | Arijit Singh meets sick child in hospital

जीवन-मरणाच्या संघर्षातील चिमुकल्यासाठी अरिजित सिंग धावले; माणुसकीने जिंकली लाखोंची मनं

नाशिकच्या कळवण येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रकरणाबाबत प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक हादरलं! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म; नात्यातील अल्पवयीन मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अमरावती येथे १८-१९ जुलै २०२६ रोजी आयोजित चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अधिकृत पोस्टर

अमरावतीत १८-१९ जुलैला चौथे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन; साहित्य, गझल, कवी संमेलन आणि परिसंवादाची मेजवानी

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

विधानसभेत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र, आता राज काय उत्तर देणार?