नवरात्रोत्सव निमित्त आझाद हिंद मंडळा तर्फे कन्या पूजन व महाप्रसाद
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव निमित्त आझाद हिंद मंडळ बुधवारा तर्फे आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता कन्या पूजन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन स्व.हरिभाऊ कलोती स्मारक बुधवारा येथे करण्यात आले.
अमरावती (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव निमित्त आझाद हिंद मंडळ बुधवारा तर्फे आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता कन्या पूजन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन स्व.हरिभाऊ कलोती स्मारक बुधवारा येथे करण्यात आले.
यावेळी परिसरातील 551 मुलींनी सहभाग घेतला. अघोर पंथात मूर्तीचे प्राण अर्पण करून नंतर पाण्यात विसर्जित करणे हे पाप मानले जाते. म्हणूनच महानवमीला माँ दुर्गेच्या नऊ रूपातील नऊ मुलींची पूजा करून, त्यांना खाऊ घालून आणि शक्य तितके द्रव देऊन निरोप दिला जातो. त्याच अनुषंगाने शनिवारी आझाद हिंद मंडळात मुलीची पूजा करून तिला जोडून नवरात्र साजरी करण्यात आली. यावेळी नागरीकांनी सुद्धा महाप्रसाद चा आनंद घेतला.
या कार्यक्रमात विलास भाऊ इंगोले, अनंतराव गुढे , किशोर फुले , दिलीप कलोती, सुनीताताई भेले , डॉक्टर निलीमा इंगोले, प्रदीप वडनेरे, सुरेश रतावा , गजानन राजगुरे , पंकज लुगीकर , प्रवीण पाटील , ज्ञानेश्वर हिवसे , मयूर जलतारे , संजय मुचलबे , राजेश जायदे , संजय हिरपुरकर , निलेश सराफ , संतोष चिखलकर, सतीश इंगोले, सुभाष पावडे, मराठी मुलींची हायस्कूल बुधवारा, मनपा उच्च प्राथमिक शाळा बुधवारा, मनपा प्राथमिक शाळा क्रमांक 2 बुधवारा, पंचशील माध्यमिक, नीलकंठ, मनपा शाळा क्र.1 भाजीबाजार येथील मुली, परिसरातील मुली, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.