भारतीय महाविद्यालयात स्मृतिशेष अण्णासाहेब वैद्य राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न
अमरावती प्रतिनिधी : भारतीय विद्यामंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय, अमरावती स्मृतिशेष अण्णासाहेब वैद्य राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न झाली.
वाद–विवाद स्पर्धा उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश कुळकर्णी,अध्यक्ष,भारतीय विद्या मंदिर, अमरावती,कार्यक्रमाचे उद्घाटक मिलिंद चिमोटे, माजी महापौर, महानगरपालिका, अमरावती तथा माजी सदस्य, व्यवस्थापन परिषद, सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ, अमरावती, प्रमुख ,उपस्थिती अनंतराव सोमवंशी ,सरचिटणीस, भारतीय विद्या मंदिर, अमरावती, ऍड. यदुराज मेटकर, प्राचार्य डॉ. आराधना वैद्य व्यासपीठावर होत्या
याप्रसंगी मिलिंद चिमोटे म्हणाले की,वाद–विवाद प्राचीन काळापासूनच कशा पद्धतीने सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये वाद–विवादाला कसं महत्त्व आहे. याचा संदर्भ अधोरेखित करून वाद–विवाद स्पर्धेचे तरुणांसाठी महत्व प्रतिपादित केलं.वाद–विवाद औपचारिक आणि अनौपचारिक असू शकतात असा विचार मांडला.
उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश कुळकर्णी म्हणाले की,आंतर महाविद्यालयीन स्तरावरील वाद–विवाद स्पर्धात एक स्पर्धक विषयाच्या बाजूने (अनुकूल) आणि दुसरा विषयाच्या विरुद्ध बाजूने (प्रतिकूल) भाषण करतो. आलटून पालटून दोन्ही बाजूंचे स्पर्धकांचे भाषण झाल्यावर प्रस्तावाबद्दलच्या कुठल्याही निष्कर्षाशिवाय निकाल जाहीर होतो. ज्या महाविद्यालयाच्या दोन्ही स्पर्धकांची वैयक्तिक गुणसंख्या सर्वाधिक असते, त्या महाविद्यालयाला सांघिक चषक व ज्या स्पर्धकाची गुणसंख्या सर्वाधिक त्याला वैयक्तिक पारितोषिक मिळते अशी माहिती दिली.
या स्पर्धेकरिता ” सरकारी मालमत्ता आणि शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण राष्ट्रीय हिताचे आहे. ” हा होता यामध्ये स्मृतिशेष अण्णासाहेब वैद्य “फिरता चषक सांघिक ” पारितोषिक ब्रजलाल बियाणी महाविद्यालय अमरावती येथील प्रणय लाहोटी, संघमित्रा विरघट पारितोषिक,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले . तर प्रथम क्रमांकाचे वैयत्तिक बक्षीस कु. वैछावी संतोष हागोने ९००१ /-लॉ कॉलेज, अकोला, दुसरा क्रमांक ७००१/ रूपयाचे पारितोषिक, रितेश कुमार,इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नागपूर,तर तृतिय क्रमांक ७००१/ रूपयाचे पारितोषिक प्रणय लाहोटी, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, अमरावती यांना मिळाले . या प्रसंगी स्पर्धेचे दानदाते पंकज वैद्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष डॉ. आराधना वैद्य,प्राचार्य, भारतीय महाविद्यालय, अमरावती,प्रमुख अतिथी माजी प्राचार्य, श्रीराम कला–विज्ञान महाविद्यालय, कु–हा, अमरावती ,डॉ. अरविंद देशमुख हे होते.प्रमुख उपस्थिती पंकज वैद्य व्यासपीठावर उपस्थितीत होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आराधना वैद्य म्हणाल्या की, वाद–विवाद हा लोकशाही व्यवस्थेतील संवाद साधण्याचा महत्त्वाचे माध्यम आहे. विद्यार्थी जीवनापासून जर वाद–विवाद स्पर्धेसाठी सहभागी होत राहिलात, भविष्यामध्ये आपल्या वक्तृत्व शैली सुधारण्यासाठी, सोबतच नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, या अनुषंगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असा विचार प्रतिवापादीत केला.
बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद देशमुख म्हणाले की,स्पर्धा कोणती असो, त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी करून उतरले पाहिजे. तरच परिणामकारकता आपल्या स्पर्धेमध्ये राहू शकते असा विचार स्पष्ट केला.
या स्पर्धेच्या परीक्षणासाठी परीक्षक म्हणून डॉ. शीतल तायडे,रामकृष्ण महाविद्यालय ,दारापुर, डॉ.प्रणव कोलते मराठी विभाग, सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ, अमरावती, डॉ. तीर्थराज राय .केसरभाई लाहोटी महाविद्यालय ,अमरावती यांनी भूमिका पार पाडली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अलका गायकवाड यांनी केले, तर आभार डॉ. दीपलक्ष्मी कुलळर्णी यांनी व्यक्त केले. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून स्पर्धक सहभागी झाले होते.