जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
दूध कैसे सांग यावे वक्षकाला?
जन्मतःची फेकते जर लेकराला..!
सोसते ती ऊन-वारा जीवनाचा,
दोष देते फक्त अपुल्या प्राक्तनाला..
अक्षदा टाकून म्हणतो दान केले,
काय ‘तो’ वस्तू समजला लेकराला..
केवढा अंधार केला त्या दिव्याने,
ठेवला होता कधी तू जो उशाला..
पोरगी ही माय बनते,बाप बनते
एकदा लावून बघ तू काळजाला…
–शरद बाबाराव काळे
९८९०४०२१३५