आठवणीचं गाठोडंकार मोतीराम राठोड यांची गोर बंजारा साहित्य अकादमीच्या अशासकीय सदस्यपदी निवड
प्रा भगवान आमलापुरे
अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) : माजी गट शिक्षण अधिकारी, जेष्ठ साहित्यिक,आठवणीचं गाठोडंकार मोतीराम राठोड यांची गोर बंजारा साहित्य अकादमीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.निवडीचे पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे. त्याबद्दल त्यांचे साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराकडुन अभिनंदन केले जात आहे.
अधिक माहिती अशी की नुकतेच महाराष्ट्र शासनाने गोर बंजारा भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी, तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी तसेच भाषिक आणि साहित्यिक अदान प्रदान व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमीची स्थापना केली आहे. दरम्यान या महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमीची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत माजी गट शिक्षण अधिकारी तथा आठवणीचं गाठोडंकार श्री मोतीराम रु राठोड यांची गोर बंजारा साहित्य अकादमीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अर्थिक वर्षाच्या सुरुवातीला माहे एप्रिल मे मध्ये अकादमीच्या कार्यक्रमाचे वार्षिक नियोजन करणे, माहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये वार्षिक नियोजनाचा आढावा घेऊन आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीतील उपक्रमांचे नियोजन करणे, यासाठी साहित्य अकादमीच्या समितीची वर्षातून साधारणतः दोन वेळा बैठक आयोजित करण्यात येते. बैठकीसाठी प्रवास भत्ता अनुज्ञेय असतो. श्री मोतीराम रु राठोड यांची आठवणीचं गाठोडे ( आत्मकथन ), गोरमाटी लोकजीवन : काल आणि आज, वचपा ही कादंबरी, एक गाव बारा भानगडी, ( आगामी कथासंग्रह ) , कथा कानासुनिच्या या २०० कथांचं लेखन पुर्ण झालेलं आहे. वेगवेगळ्या दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. वेगवेगळ्या दैनिकात नियमितपणे वैचारिक, राजकीय आणि सामाजिक लेखन चालू आहे.
समितीतील इतर सदस्यांची नावे अशी आहेत. श्री फुलसिंग क जाधव, कार्याध्यक्ष ; श्री सुरेश मं राठोड, अशासकीय सदस्य; डॉ जगदीश बा सकवान, अशासकीय सदस्य ; प्रा डॉ निशा ह पवार, अशासकीय सदस्य ; सौ विजया श्री पवार, अशासकीय सदस्य ,विनायक पवार ,विरा राठोड, अरुण पवार, भिमराव राठोड, संजय आणि आठवणीचं गाठोडंकार श्री मोतीराम रु राठोड, अशासकीय सदस्य. या बद्दल त्यांचे कवी विजय पवार, गणेश चव्हाण, मु अ दिगंबर वाघमारे, पत्रकार माधव गोधणे,लोकशाहीकार एन डी राठोड ,नाथराव राठोड, एच आर राठोड , जयपाल राठोड , प्रा डॉ रमाकांत गजलवार आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी अभिनंदन केले आहे.शिवाय ,साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराकडुन अभिनंदन केले जात आहे..