मुंबई : शिवानी पब्लिकेशन , मुंबई आयोजित २०२३ चे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. अहमदनगर येथील ख्यातनाम अशा ‘ साहित्याक्षर ‘ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांचा यात समावेश आहे . यामध्ये कथा विभागातील प्रथम श्रेणीचा प्रा. वि.शं.चौगुले साहित्य पुरस्कार प्रा. यशवंत माळी यांच्या *उलघाल* या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.
तसेच दुसरा कविता विभागातील शिवानी साहित्य गौरव पुरस्कार . डॉ . संजय बोरूडे यांनी अनुवादित केलेल्या *अभिसत्य* या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे . हंगेरियन कवी *सॅन्दोर हाल्मोसी* यांचा कविता संग्रह त्यांनी मराठीत अनुवादित केला आहे . विशिष्ट उंचीवर स्थिरावलेला अध्यात्मिक व तरल ज्या जाणिवाअसलेल्या या कविता संग्रहास अल्पावधीतच हा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे.
दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.०० वा. पक्षी अभयारण्य, धारावी बस डेपो जवळ, सायन मुंबई येथे हे पुरस्कार कुटूंब रंगलय काव्यात ते सर्वेसर्वा *प्रा.विसुभाऊ बापट* यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ,