कचरामुक्त होळी
होळीचा हा सन भाऊ |
हाय ना लायच भारी ॥
रंगाची ही उधळण ।
घरोघरी दारोदारी ॥
ग्राम पूर्ण स्वच्छ करा ।
कचऱ्याची करा होळी ॥
अर्पण न करता द्यावी ।
गरिबांना पुरणपोळी ॥
निरोगी आरोग्य लाभे |
स्वच्छता होई ग्रामात ॥
वर्षभरच होणार भाऊ ।
आनंदाची रोज बरसात ॥
पर्यावरणाची भाऊ ।
करू नये कोणी हानी ॥
रंगोत्सवात रंगावे ।
पण वाचवावे पाणी ॥
दुष्ट प्रवृत्तीचे मानवाने।
दहन करावे होळीत ॥
घरोघरी पेटवावी ।
आनंदाची शुद्ध ज्योत ॥
व्हावे कचरामुक्त ग्राम ।
तसे व्हावे व्यसनमुक्त ॥
निरामय आरोग्याची ।
पेटवावी स्वतः वात ॥
देऊ नये शिव्या शाप ।
रंगोत्सवात या कोणी ॥
बोलताना नेहमीच l
असू द्यावी गोड वाणी ॥
मनाची शुद्धता होळी ।
शरीर शुद्धता होळी ॥
ग्रामाची शुद्धता होळी ।
हीच खरी नि शुद्ध होळी ॥
-प्रा .अरुण बाबारावजी बुंदेले,
(संत कबीर कविराज पुरस्कार प्राप्त)
रुक्मिणी नगर ,अमरावती .
भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९
ReplyForward |