दिवाळी…
आली आली दिवाळी
नका साजरी करू होळी
गुळ टाकून केल्यावरही
कडु होईल बरं का पोळी
आवेशात दिवाळीच्या
फोडत असाल फटाके
काळजी घेतली नाही तर
बसतील जखमांचे चटाके
दिवाळीच्या आनंदावर
विरजण पडणार नाही
साजरी करा दिवाळी
विपरित घडणार नाही
फटाके फोडतानांही
स्व:ताला मित्रांनो सावरा
साजरा करा सण पण
लहान मुलांना आवरा
गोड गोड पदार्थांचा
आस्वाद घ्यावा गोड
शरीर ठेवा बाजूला
टाळा अंगावरचे फोड
दरवर्षीच्या दिवाळीला
तरच लावता येतील दिवे
अशी घेतली काळजी
तर मुकणार नाही जिवे
– पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१