माजी सैनिकांसाठी सरळसेवा भरती; 16 ऑक्टोबरपर्यंत नोंदणीचे आवाहन
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : सरळसेवा भरतीव्दारे माजी सैनिक व वीरपत्नीसाठी तृतीय श्रेणीतील भूकरमापक, टंकलेखक या पदाच्या माजी सैनिक संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
याकरीता ज्यांनी मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हील इजनिंअरींग धारण केला आहे. किंवा ज्यांनी माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्व्हेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र धारण केले आहे.
अशा माजी सैनिकांनी, वीरपत्नी यांनी आपल्या नावाची नोंदणी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 16 ऑक्टोबर 2023 पुर्वी करावी. जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक पाल्य, वीरपत्नी यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष आर. बिजवळ यांनी केले आहे.