गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा माहिती कार्यालय, अमरावतीचे वरिष्ठ लिपिक योगेश गावंडे यांच्या मातोश्री पुष्पाताई अजाबराव गावंडे यांचे अल्पशा आजाराने रविवारी (दि.१) निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय 56 वर्षे होते. त्यांचा पार्थिवावर आज (दि.२) हिंदू स्मशानभूमी, अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगा योगेश, सून हेमा व दोन नातवंड आरोही आणि अद्वित असा आप्त परिवार आहे.