Contents
hide
अमरावती (प्रतिनिधी) : नगरविकास दिनाचे औचित्य साधून “शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ ” मध्ये ‘ड’ वर्ग महानगरपालिका मधून दहा कोटींचे द्वितीय पारितोषिक अमरावती महानगरपालिकेस मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आयुक्त तथा प्रशासक डॉ. प्रविण आष्टीकर यांना प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रम दि. २० एप्रिल २०२३. स्थळ टाटा नाट्यगृह , नरिमन पॉइंट मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुक्तांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. या सर्वांच्या एकत्रित कामामुळे, टीम वर्क मुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. विषेश कौतुक शहर अभियंता व त्यांची इंजिनियर टीम व सर्व सहाय्यक आयुक्त यांचे त्यांनी केले आहे.