अशोका बिझनेस स्कूलतर्फे आयोजित अशोका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
नाशिकः अशोका बिझनेस स्कूलच्या वतीने अशोका ग्रुप ऑफ स्कुल चांदशी या क्रिकेट मैदाना वर आयपीएल या संकल्पनेस अनुसरून अशोका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. ही संपूर्ण क्रिकेट टूर्नामेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयोजित केली.
या स्पर्धेचे उदघाटन अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ नरेंद्र तेलरांधे आणि महाविद्यालयाच्या प्रभारी संचालिका डॉ.सरिता ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सामन्याचा समारोप माजी रणजी क्रिकेट पटू डॉ दिनेश सबनीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ.दिनेश सबनीस यांनी अंतिम सामन्यासाठी चे नाणेफेक करून आणि मानाची एक ओव्हर खेळून खेळास सुरवात केली. स्पर्धे नंतर त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
या स्पर्धेमध्ये आयपीएल प्रमाणे संघ मालक, व्यवस्थापक याद्वारे खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. संघ निवड व संघ व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. विद्यार्थ्यांचे एकूण नऊ संघ सामन्यात सहभागी झाले होते. रोमांचक अशा या नऊ सामन्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि संचालक मंडळ यांनी संघ बांधणीच्या भावनेने स्पर्धेत उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला. यात सुपर नोव्हा – कर्णधार मोहित असिजा या संघाने विजेतेपद पटकावले, तर रॉयल स्ट्रायकर्स – कर्णधार सिब्पेन शेख या संघाने उपविजेतेपद मिळवले . उत्कृष्ट फलंदाज सौरव पगार तर उत्कृष्ट गोलंदाज अभिनव कलंत्री ठरले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तुषार कोचर आणि उत्कृष्ट महिला फलंदाज प्रीती करंजकर,उत्कृष्ट महिला गोलंदाज मानसी काबरा, नेहा कासरले, आणि श्रद्धीता शिंदे यांना पारितोषिके मिळाले.
अशा स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय धडे शिकायला मिळतात. संघनायकाची कर्त्यव्य, अधिकार, नियोजन यांचा समन्वय साधून स्पर्धेत कसे खेळावे,प्रत्येक स्पर्धकाने वैयक्तिक महत्वकांक्षे पेक्षा संघ विकास आणि यश याला महत्व कसे द्यावे, नेतृत्वगुणांचा वापर कसा करावा हे अशा स्पर्धे मधून विद्यार्थी शिकतात. स्पर्धे नंतर एकमेकांवर विश्वास व क्रीडाशक्ती बळकट झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. स्पर्धा हि केवळ जिंकण्यासाठी नाही तर प्रामुख्याने महत्त्वपूर्ण व्यवस्थापन धडे आणि संघ नेतृत्व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी असते याची जाणीव झाल्याची भावना विदयार्थ्यांनी व्यक्त केली .
स्पर्धेचे समन्वयक डॉ. वैभव भालेराव यांच्या नेतृत्वाखाली ऋषीकेश मोरे व आशुतोष सोनवणे या विद्यार्थी समन्वयकांनी महत्वाची भूमिका पार पाडली डॉ.विकास गौंडारे, विशाल सोनकांबळे यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले.डॉ महेश वाघ यांनी रोमहर्षक सामान्यांचे समालोचन ( कॉमेन्ट्री )केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक कटारिया, सचिव श्री श्रीकांत शुक्ल यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थी,प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि व्यवस्थापकीय मंडळ अशोका प्रीमियर लीगच्या या स्पर्धेसाठी उपस्थित होते .