अमरावती (प्रतिनिधी):दिनांक 20/04/2023 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शुभांगीताई काळभोर व विदर्भ प्रदेशाध्यक्ष मिलिंद रंगारी सर यांनी एका संयुक्त नियुक्ती पत्रकाद्वारे… साहित्य, सांस्कृतिक , शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे राज इंगळे, शेगाव यांची विदर्भ प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती बद्दल राज इंगळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या कार्य कुशलतेने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे व थोर समाजसुधारक महात्मा फुले, राजे छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे तद्वत आपल्या सात्विक सुविचारांची पेरण करून समाजामध्ये समानतेचा मळा फुलवण्याची इच्छा राज इंगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.