मंडळ…
आबा हाय काय..?
कोण होय बे…इतक्या अंधारात आले ?
आमी हावो, बाल गनेस मंडळ चे कारेकर्ते…
अबे ,आता त एका मंडळा चे पोट्टे यिऊन गेले ना…!
ते म्हने आमी खरे ओरजीनल मंडळ हाव…!
माजोळून दिळशे जबरदस्तीने नेले ना…!
आता तुम्हाले देत नाही….!
आबा तुमाले आम्ही वोयकीचे नाही काय..?
आमच्यातल कोनी होत का तेच्यात…?
अबे मागच्या वरशीचे तुमच्या संगचे अर्धे तेच्यात होते…!
ते आले होते काय..? आमी तेयले मंडळातून काळून टाकल…!
कामुन काय झालं..?
तेयन हिशेबात घोय केला होता…!
अस..!
आता तुमच्या सांग जे दिसून रायले ,हे त मांगच्या वरसी तिसऱ्याच मंडळा सांग आले होते..?
त्याच कसं हाय आबा ! त्या मंडळात आमचा काई ईकास झाला नाही….!
म्हनुन हे मंडळ ईकासाच मंडळ हाय अस समजून आमी हेच्यात आलो….!
आबे..! ते पयल मंडळ पन असच म्हने…!
आता मी कोनाचं खर मानू..?
ते काही नाही….आता मी दा दिवस तुमची मजा पायतो
मंगच पैसे देतो…..!
आता निंघा तुम्ही…!
आबा हायत काय..?
आता कोन होय…!
आमी इगन हर्ता मंडळ…!
थांब मले आता ब्याट्रिक आनु दे…!
आता कायले तोंड लपोता….!
काबे तुमच्यातले अर्धे त कालच्या मंडळात होते..!
ते काय झालं आबा ..! तेयची ईचारधारा आमाले पटली नाही….!
असं..!इचारधारा पटली नाही..?
या बुडी संग पन्नास वरशा पासून मी राहून रायलो..! मले तिचे ईचार अजून समजले नाही…?
अन् तुम्हाला चोवीस घंट्यात तेयचे ईचार समजले …?
आता तुमी जाता…का टेंप काळू….?
चला पया बे… बुडा लय गरम हाय…!
– सुनिल ढोकणे
(शेलुबाजार)
तुलसी नगर, मूर्तिजापूर
ReplyForward |