दुष्काळी झळाची सल, पी एच डी देऊन गेली
हाडाचा शिक्षक, कवी, व्याख्याता आणि व्यसनमुक्ती साठी कार्य करणारा अवलिया माणूस म्हणजे रोकडे वस्ती खडकवाडी येथील प्राथमीक शिक्षक बाळासाहेब शिंगोटे सर. पारनेरच्या पाचवीला पुजलेला सततचा दुष्काळ असल्यामुळे. त्या दुष्काळी झळा पारनेरकरांना जश्या सोसाव्या लागतात तश्या त्यांना ही सोसाव्या लागल्या. त्यातुन अनेक प्रश्न त्यांच्या मनात घर करू लागले. जिज्ञासूवृत्ती असल्यामुळे व सतत काही न काही करत राहायचं ह्या स्वभावामूळे त्या प्रश्नांची उत्तरे शोधन सुरू झालं आणि सुरू झाला पी एच डी चा प्रवास.
दुष्काळ निवारणासाठी काम करणारे पोपटराव पवार आणि जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या कार्याचा ही त्यांनी अभ्यास केला. पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम कशी यशस्वीपणे राबवली त्या गावांना भेटी व प्रत्यक्षात अण्णा आणि पोपटराव पवार यांची ही त्यांनी भेट घेऊन चर्चा केली पाणी फौंडेशन योजनेतील कार्य ही समजून घेतले. खूप कष्ट आणि मेहनत घेऊन शोध निबंध तयार झाला.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे ह्या ठिकाणी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळ:एक चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला. पीएचडी इतिहास संशोधन केंद्र, न्यू आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज(स्वायत्त)अहमदनगर येथे इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ किसन अंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून बाळासाहेब शिंगोटे यांनी हे यश संपादन केले!
श्री शिंगोटे हे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेने ५ सप्टेंबर २०१९ रोजी शैक्षणिक सेवेतील योगदानाबद्दल जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे ! महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष, म्हणून ते व्यसनमुक्ती व प्रबोधनाचे कार्य करत आहेत. शिव-शंभूराजे चरित्र व इतर सामाजिक विषयावर ते व्याख्याने देत आहेत. यापूर्वी सह्याद्रीभूषण, शिक्षकरत्न, राजर्षी शाहू महाराज यशवंत गौरव, गुणवंत शिक्षक, साहित्यरत्न, राष्ट्रबांधणीचे शिल्पकार इ.राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.!
त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. भास्कर राव झावरे,डॉ मीना साळे, डॉ नवनाथ येठेकर, डॉ गुंफा कोकाटे, डॉ विश्वास गवारी, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, गटशिक्षणाधिकारी विनेश लाळगे, रावबा केसकर, विस्तार अधिकारी के बी मेंगाळ, संभाजी झावरे, अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख क्षीरसागर, दौलत येवले शिक्षक बँकेचे संचालक कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, प्रल्हाद भालेकर, संदीप ठाणगे, सुरेश निवडुंगे इ.मान्यवरांनी अभिनंदन…!