Monday, December 8

News

अभिनेता व्हायचं होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!
News

अभिनेता व्हायचं होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!

अभिनेता व्हायचा होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!मुंबई म्हणजे स्वप्ननगरी — पण इथं स्वप्नं पूर्ण व्हायच्या आधीच अनेक जण ‘नाटकात’ अडकतात! अशाच एका तरुणाने अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट लोकल ट्रेनलाच आपलं फिल्म सेट बनवलं.हा तरुण लोकलमध्ये पाय निकामी असल्याचं नाटक करत भीक मागत होता. मोठं शर्ट घालून, पाय दडवून तो सरपटत प्रवाशांकडे मदत मागत होता. सगळ्यांना त्याची दया आली… पण काही क्षणांनीच सगळ्यांचा धक्का बसला! डब्यातून बाहेर पडताच तो ‘अपंग’ तरुण चक्क आपल्या दोन पायांवर ठणठणीत चालू लागला. आणि लगेच दुसऱ्या डब्यात घुसून पुन्हा ‘अभिनय सुरू’ केला.हा व्हिडीओ “goga_ga” या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाल्यानंतर इंटरनेटवर तुफान गदारोळ माजलाय. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया म्हणजे एकदम...
विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!
News

विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!

विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भव्य उद्घाटन आज पार पडलं. या ऐतिहासिक क्षणी मोदींनी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जननेते दि. बा. पाटील यांचं नाव घेत त्यांना अभिवादन केलं. “दि. बा. पाटील यांनी सेवाभावाने समाजकार्य केलं, त्यांचं जीवन सर्वांना प्रेरणा देणारं आहे,” असे भावनिक शब्द मोदींनी उच्चारले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदींनी मराठीतून शुभेच्छा देत म्हणाले, “विजयादशमी झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली आणि आता दहा दिवसांनी दिवाळी — तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!” त्यानंतर त्यांनी मुंबई व महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव करत म्हटलं, “आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली आहे. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट आशियात...
शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद
News

शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद

शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवादनवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह “धनुष्यबाण” यावरील मालकी हक्काच्या वादावर आज, मंगळवार (८ ऑक्टोबर २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू केला. मात्र, काही कारणांमुळे आजची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि अखेर न्यायालयाने ही सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल असे जाहीर केले.सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागणे आवश्यक आहे.” त्यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ देण्याची विनंती केली. तथापि, दुसऱ्या बाजूच्या वकिलांच्या वारंवार हस...
मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेश
News

मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेश

मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेशTraffic Police News मुंबई : वाहतूक पोलिसांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ई-चलान कारवाई करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आता स्वतःचा खाजगी मोबाईल वापरून फोटो किंवा व्हिडिओ काढणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, खाजगी मोबाईलने गाड्यांचे फोटो काढताना आढळल्यास थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.वाहतूक संघटनांच्या तक्रारीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक अधिकारी खाजगी मोबाईलने फोटो काढून नंतर “सोयीनुसार” ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करतात आणि निष्पाप नागरिकांवर चुकीचे चलान लावतात, अशी तक्रार संघटनांनी केली होती.या पार्...
११ हजार वोल्ट पडला,  पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण
News

११ हजार वोल्ट पडला, पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण

११ हजार वोल्ट पडला, पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राणहिरो बनण्यासाठी ना सिक्सपॅक लागतं, ना चित्रपटात अॅक्शन सीन! बिहारच्या किशनगंजमध्ये केवळ ३ वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या आईसाठी असं धाडस दाखवलं की, देशभरातील नेटकरी थक्क झाले आहेत. एका महिलेला रस्त्याच्या कडेला उभं असताना तब्बल ११ हजार वोल्टेज विजेची तार अंगावर पडली. क्षणभरातच तिचं आयुष्य संपणार असताना तिचा छोटा मुलगा देवदूतासारखा धावला आणि आईला विजेपासून दूर खेचलं. त्या एका क्षणात आईचे प्राण वाचले आणि सगळे अवाक् झाले!हा हृदयस्पर्शी व्हिडिओ @Mahamud313 या एक्स (X.com) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, कॅप्शननुसार ही घटना किशनगंज, बिहार येथे घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला रस्त्याच्या कडेला उभी असते आणि अचानक विजेची तार तिच्यावर कोसळते. ती तार ११ हजार वोल्टेजची असल्याचं सांगितलं ज...
ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!
News

ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!

ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!मुंबई :‘लाडकी बहिण योजना’च्या लाभार्थींना पुन्हा एकदा थोडीशी चिंता लागली आहे. कारण योजनेत मोठं अपडेट आलंय — आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. पण यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे * सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी नसेल तर थांबणार का?यावरून राज्यभरात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याआधीच ई-केवायसीचं ‘भूत’ लाडक्या बहिणींच्या डोक्यावर आलं आहे.अधिकृतरीत्या सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी पुढील महिन्यांपासून विशेषतः नोव्हेंबरचा हप्ता ई-केवायसी पूर्ण न झाल...
सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम
News

सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम

सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठामसोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने शूज फेकले. सुदैवाने तो शूज सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.घटनेनंतर सरन्यायाधीश गवई म्हणाले, “अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही. कृपया सुनावणी पुढे चालू ठेवा.” प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शूज फेकणारा वृद्ध व्यक्ती “हिंदुस्तान सनातनचा अपमान सहन करणार नाही” असे घोषणा देत न्यायाधीशांच्या बेंचकडे शूज फेकत होता. न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.माहिती नुसार, त्या व्यक्तीकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील व क्लार्क यांना दिले जाणारे प्रॉक्सिमिटी कार्ड होते. त्यावर किशोर राकेश असे नाव नोंदलेले आह...
‘टीईटी’शिवाय पदोन्नती नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने थांबल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती
News

‘टीईटी’शिवाय पदोन्नती नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने थांबल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती

‘टीईटी’शिवाय पदोन्नती नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने थांबल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीसोलापूर : शिक्षकांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ‘टीईटी’ (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी या पदांवर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे टीईटी न उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची पदोन्नती सध्या थांबविण्यात आली आहे.न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागांनी पदोन्नतीची कार्यवाही थांबविली आहे. यामुळे अनेक वरिष्ठ शिक्षकांची पदोन्नती प्रक्रियाच ठप्प झाली आहे.केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे सरळसेवा आणि उर्वरित ५० टक्के पदे पदोन्नतीद्वारे भरली जातात. विस्ताराधिकाऱ्यांचीही अशीच पद्धत आहे. मात्र, आता या दोन्ही प्रकारांमध...
राजश्री टंडन मुक्त विद्यापीठात अभ्यासक्रमात RSSचा इतिहास
News

राजश्री टंडन मुक्त विद्यापीठात अभ्यासक्रमात RSSचा इतिहास

राजश्री टंडन मुक्त विद्यापीठात अभ्यासक्रमात RSSचा इतिहासप्रयागराज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील राजश्री टंडन मुक्त विद्यापीठाने (UPRTOU) आपल्या पदवी (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) इतिहास समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारतीय ज्ञान परंपरेचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सत्यकाम यांनी सांगितले.त्यांच्या मते, आरएसएस आणि भारतीय ज्ञान परंपरा यांच्यात अतिशय घनिष्ठ संबंध आहे. संघ केवळ धार्मिक संस्था नसून सामाजिक, राजकीय आणि नैतिक मूल्यांचा संवाहक आहे. “वसुधैव कुटुंबकम्”, सहिष्णुता, विविधता, आत्मनिर्भरता आणि स्वदेशी या भारतीय तत्त्वांवर संघ कार्य करतो.कुलगुरू सत्यकाम यांनी म्हटले की, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा आणि ...
जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!
News

जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!

जयपूर हॉस्पिटलला भीषण आग; सहा रुग्णांचा मृत्यू, २० मिनिटं कोणी लक्ष दिलं नाही नातेवाईकांचा आरोप!जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे रविवारी पहाटे खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आग लागल्यानंतर तब्बल २० मिनिटे कोणीही लक्ष दिलं नाही आणि वॉर्डबॉय तिथून पळून गेले.एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, “जेव्हा धूर दिसायला लागला तेव्हा मी डॉक्टर आणि नर्सला सांगितलं. पण कुणीही काही केलं नाही. प्लॅस्टिकच्या ट्यूब जळत होत्या आणि धूर पसरत होता. वॉर्डबॉय सगळे पळून गेले. मीच माझ्या आईला आयसीयूतून बाहेर काढलं. तिची प्रकृती काय आहे, हेही कुणी सांगत नाही.”मात्र रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनुराग धाकड यांनी हे आरोप फेटाळले. ते म्हणाले, “घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये ११ रुग्ण होते. आमच...