Thursday, March 5

News

ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!
News

ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!

तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दशासर परिसर आज दणाणून गेला, कारण हजारो शेतकरी, महिला व युवकांनी माजी आमदार मा. विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरोधात दोन तासांचा ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन केला. “सरकार जागे व्हा!”, “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “कर्जमाफी जाहीर करा!” अशा घोषणांनी औरंगाबाद रोडवर जनआक्रोशाचा लोंढा उसळला.काँग्रेसचा सरकारला इशारामाजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी आंदोलनादरम्यान सांगितले,“शेतकरी आत्महत्येच्या टोकावर आहे. कर्जमाफी ही त्याची मागणी नाही, ती त्याची गरज आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करतं, पण शेतकऱ्याला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही शांत बसणार नाही — काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार!” ते पुढे म्हणाले,“शेतकऱ्यांचा घाम सोन्यासारखा मौल्यवान आहे. जर सरकारने त्यांच्या अश्रूंना किंमत दिली नाही, तर जनता ...
पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?
News

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?देहराडून (उत्तराखंड) : प्रेमाला ना वयाचं बंधन, ना नात्याचं! पण या “प्रेमकहाणी”नं मात्र नात्यांचे सगळे अर्थ बदलून टाकले आहेत. उत्तराखंडातील देहराडूनमध्ये घडलेली ही घटना ऐकून कुणीही थक्क होईल कारण इथे फक्त पत्नीच नव्हे, तर पतीदेखील आपल्या जोडीदाराला सोडून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये गेले आहेत!एका विवाहित महिलेने आपल्या पतीला आणि तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर जे घडलं ते आणखीन धक्कादायक तिच्या पतीलाही दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाताना पाहून लोकांचं डोकं फिरलं. आता प्रश्न एकच मुलांचं काय?महिला आयोगाकडे दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल झाली आहे. पत्नीचं म्हणणं “माझ्या पतीला एका महिलेनं फसवलं!” तर पतीचं म्हणणं “माझ्या पत्नीची दिशाभूल करण्यात आली!” आता नेमका बळी कोण आणि दोषी कोण हे ठरवणं आय...
जगातील सर्वात स्वस्त हॉटेल फक्त 20 रुपयांत मुक्काम!
News

जगातील सर्वात स्वस्त हॉटेल फक्त 20 रुपयांत मुक्काम!

प्रवासासाठी किंवा कामानिमित्त अनेकजण वेगवेगळ्या शहरांत मुक्काम करतात. मात्र हॉटेलचं वाढतं भाडं अनेकदा खिशाला चटका लावतं. पण जर तुम्हाला सांगितलं की जगात असं एक हॉटेल आहे जिथे केवळ २० रुपयांत एक रात्र मुक्काम करता येतो तर? होय! पाकिस्तानमधील पेशावर शहरात असलेलं हे अनोखं हॉटेल सध्या जगभर चर्चेत आहे.या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी फक्त ७० पाकिस्तानी रुपये, म्हणजेच अंदाजे २० भारतीय रुपये आकारले जातात. एवढ्या कमी दरात कोणत्या सुविधा मिळतात हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.या हॉटेलच्या खास सुविधा या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी एक खाट, स्वच्छ चादर, पंखा, कॉमन बाथरूम आणि मोफत चहा या सुविधा दिल्या जातात. मात्र येथे खोली नसून झोपण्यासाठी इमारतीच्या छतावर जागा दिली जाते. म्हणजेच प्रवासी आकाशातील तारे पाहत झोपतात एक वेगळाच अनुभव!हे हॉटेल पारंपरिक पश्तून वास्तुकलेने बांधलेलं आहे आणि ते विटा व दगडांनी बन...
अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?
News

अमिताभ बच्चन यांचा ‘दहा हजारांचा’ दिवाळी बोनस; जनता म्हणते – ‘बिग बी की स्मॉल गिफ्ट?

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि भेटवस्तूंचा उत्सव. पण यंदा सोशल मीडियावर मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटीवरून वाद पेटला आहे.अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचा डबा आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम दिल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एका कंटेंट क्रिएटरने जुहू येथील ‘जलसा’ बंगल्या बाहेर हा व्हिडिओ शूट केला असून, कर्मचाऱ्यांपैकी एकाने स्वतः ही माहिती दिली आहे.हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बिग बींवर टीकेची झोड उठवली आहे. “बिग बींची संपत्ती जशी प्रचंड, तशी भेट मात्र ‘मिनिमल’ का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. एका युजरने लिहिलं, “ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभर त्यांच्यासाठी काम केलं, त्यांना फक्त 10 हजार? लाजिरवाणं आहे हे!”तर काहींनी बच्चन यांच्या बाजूनेही मत मांडलं. “भेट किती दिली हे न...
एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी
News

एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळी

एकतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्टेशनवर ३७व्या जनआंदोलनातून साजरी अनोखी दिवाळीएकतेचा संदेश देत शकुंतला रेल्वे स्टेशनवर एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या ३७व्या प्रतीकात्मक जनआंदोलनातून ही दिवाळी सामाजिक एकतेचा दीपोत्सव ठरली. दिवाळीचा उत्सव सामान्यतः प्रत्येकजण आपल्या घरात साजरा करतो; परंतु या वेळेस नागरिक, महिला, बालगोपाल, व्यापारी आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशन परिसरातच आनंदोत्सव साजरा केला. विषमतेचा अंधार दूर करून एकतेचा प्रकाश जागविण्याच्या हेतूने शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला.अचलपूर रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजता स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, जमात-ए-इस्लामिक महिला संघटन, मानव सेवा समिती, व्य...
१० रुपयांत दिवाळीचा फराळ!
News

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!अंबरनाथ : दिवाळीचा सण लोकांसाठी आनंद आणि गोडी घेऊन येतो. मात्र महागाईमुळे फराळाचे साहित्य अनेक कुटुंबांसाठी परवडणं कठीण झालं आहे. अशा पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये शिवसेनेने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे — फक्त १० रुपयांत दिवाळी फराळाचे साहित्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५ ते ६ हजार कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे. फराळ साहित्यामध्ये चिवडा, शेव, लाडू, करंजी यांसारखी पारंपारिक दिवाळीची गोडीची वस्त्रे होती.हा उपक्रम माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत “सणाच्या आनंदात गोडी आणणारा” असं शिवसेनेच्या प्रयत्नाचं वर्णन केलं.स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, “आजच्या काळात फक्त १० ...
न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी  तिसऱ्या मजल्यावरून उडी!
News

न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!

न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!पुणे : “तारीख पे तारीख…” गेली २७ वर्षे कोर्टात न्यायाची वाट पाहणाऱ्या पक्षकाराने शेवटी मृत्यूचीच निवड केली. पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी आयुष्य संपवलं. या हृदयद्रावक घटनेने न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव गेल्या २७ वर्षांपासून जमीन व्यवहाराशी संबंधित एका वादग्रस्त प्रकरणात न्याय मिळण्याची वाट पाहत होते. प्रत्येक सुनावणीला केवळ “तारीख” मिळत होती, निकाल नव्हता. या सततच्या विलंबामुळे ते नैराश्यात गेले होते. बुधवारी सकाळी त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. म...
काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!
News

काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!

काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!सोशल मीडियावर दररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवर हशा पिकलाय. कारण यात आहे एक भन्नाट ट्विस्ट जिथे प्रेमाची सफर अचानक बुक्क्यांच्या वर्षावात बदलते!व्हिडिओमध्ये एक काका आणि काकू बाईकवर बसलेले दिसतात. गाडी सुरू होते, पार्श्वभूमीला रोमँटिक गाणं ‘ये वादा रहा’ चालू आहे आणि सगळं अगदी चित्रपटासारखं. पण काही क्षणातच दृश्य बदलतं काकूंचा मूड बिघडतो आणि त्या थेट काकांच्या पाठीवर हात उगारतात! बुक्क्यांचा असा पाऊस सुरू होतो की बाईक थांबवावी की जीव वाचवावा, हे काकांनाही कळेनासं होतं.दिल्ली नंबर प्लेट असलेल्या या बाईकवरील प्रसंगाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कुणी लिहिलं, “ही खरी लग्नानंतरची रिअॅलिटी!” तर कुणी म्हटलं, “काकूंचं प्रेमही ‘ॲक्शन पॅक...
नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा छापा; बनावट गुडनाइट उत्पादनांचा जाळा उध्वस्त
News

नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा छापा; बनावट गुडनाइट उत्पादनांचा जाळा उध्वस्त

नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा छापा; बनावट गुडनाइट उत्पादनांचा जाळा उध्वस्तमुंबई : घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची बनावट उत्पादने तयार करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर नागपूर पोलिसांनी मोठा छापा टाकला आहे. ही कारवाई गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.स्थानिक पोलिस आणि जीसीपीएलच्या तपास यंत्रणेच्या मदतीने ह्या कारखान्याचा शोध लावला गेला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात बनावट गुडनाइटची सामग्री जप्त करण्यात आली आहे. जप्त वस्तूंपैकी 10,937 रिकामे गुडनाइट बॉक्स, 2,641 बनावट स्टिकर्स, 7 रिकामे कार्टन आणि 2 तयार बनावट गुडनाइट उत्पादने समाविष्ट आहेत.या कारवाईत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा 2023 च्या कलम 318 (4) अंतर्गत FIR नोंदवण्यात आली आहे. पोलिस आता या रॅकेटशी संबंधित संपूर्ण पुरवठा नेटवर्क व संपर्कां...
टॅक्स भरतो, पण रस्त्यावर थुंकतो; पुण्यातील रिक्षावाल्याचा व्हायरल व्हिडीओ
News

टॅक्स भरतो, पण रस्त्यावर थुंकतो; पुण्यातील रिक्षावाल्याचा व्हायरल व्हिडीओ

टॅक्स भरतो, पण रस्त्यावर थुंकतो; पुण्यातील रिक्षावाल्याचा व्हायरल व्हिडीओपुणे : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते, पण काही वेळा काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. पुण्यातील एक रिक्षाचालक रस्त्यावर थुंकताना पकडला गेला. पण जाब विचारल्यावर त्यानं आपली चूक मान्य करण्याऐवजी “मी टॅक्स भरतो” असं उत्तर दिलं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.सामाजिक माध्यमांवर हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. स्वच्छतेसंदर्भात रस्त्यांवर पाट्या लावल्या आहेत, कायदे आहेत आणि प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य आहे की तो सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळेल. मात्र काही लोक अजूनही या नियमांकडे दुर्लक्ष करतात, जे समाजासाठी धोकादायक ठरू शकते.सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, अशा लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावण्यासाठी शाळांपासूनच जनजागृती करणे, सामाजिक मोहिमांचा विस्तार...