Sunday, February 1

Gerenal

युनीसेक्स किचन..!
Gerenal

युनीसेक्स किचन..!

युनीसेक्स किचन..    काल संध्याकाळी एका कॅफेत कॉफी प्यायला फ्रेंड्स भेटलो होतो.. कोणाची तरी झोमॅटोची ऑर्डर होती.. तो डिलीव्हरी बॉय दिवसभर डिलीव्हरी करुन इतका थकलेला होता कि त्याने ते पार्सल त्या बॅगेत फेकलं आणि तिथून निघाला.. इतक्या सगळ्या दिवसभराच्या मेहनतीनंतर बिचाऱ्याला किती पैसे मिळत असतील ??.. हाही प्रश्न मनात येउन गेला.. तो तिथून निघून गेला आणि मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिले.. त्यावेळी त्याला भुकही लागली असेल.. घरी त्याचं कुटुंब वाट पहात असेल.. किवा कुटुंब असेल कि नाही माहीत नाही.. फुड तयार करणारा तो कुक त्याची मानसिक/ आर्थिक कंडीशन काय असेल ??.. या सगळ्या प्रश्नानी मन सैरभैर झालं.. आणि इतकं सगळं झाल्यावर रात्री ९ नंतर जेव्हा त्या व्यक्तीच्या पोटात ते अन्न जाईल तेव्हा त्याचं रूपांतर कशात झालेलं असेल ??.. त्या अन्नातून त्याच्या पोटात काय जाईल ??बापरे... म...
दही रोज खा, आरोग्यदायी रहा! जाणून घ्या दह्याचे अनोखे फायदे!
Gerenal

दही रोज खा, आरोग्यदायी रहा! जाणून घ्या दह्याचे अनोखे फायदे!

दही हे भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जेवणात दह्याला नेहमीच स्थान असतं. केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे, तर आरोग्यासाठीही दही अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळेच दह्याला सुपरफूड म्हटलं जातं. दह्यात प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले जिवाणू असतात, जे आपल्या पचनसंस्थेला निरोगी ठेवतात. याशिवाय कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२ आणि पोटॅशिअम या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेले दही शरीराला उर्जा देतं, हाडे मजबूत करतं आणि एकूण आरोग्य सुधारतं.रोज दही खाल्ल्यास अनेक प्रकारे शरीराला फायदा होतो. सर्वात आधी, दह्याचे सेवन हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात असलेले पोषक घटक शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर दह्यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय...
बायकोशी खोटं बोलल्यास झटपट हिशोब!
Gerenal

बायकोशी खोटं बोलल्यास झटपट हिशोब!

बायकोशी खोटं बोलल्यास झटपट हिशोब!संसार म्हटला की भांड्याला भांडं लागतंच! नवरा-बायकोच्या नाजूक नात्यात रुसवे, फुगवे आणि लहानमोठ्या गमतीजमती नेहमीच सुरू असतात. या लहान लढायांमध्येच जीवनाचा खरा रंग आणि मजा दडलेली असते. हल्ली सोशल मीडियावर अशा गमतीजमतींचे व्हिडिओस, मीम्स आणि पोस्टर्स जोरदार व्हायरल होत आहेत.अशाच एका पोस्टरवर लिहिलं आहे “बायकोशी कधीही खोटं बोलू नका, कारण ती तुम्हाला तेच विचारते, जे तिला आधीच माहीत असतं.” हे वाचल्यावर नवऱ्यांना लगेचच ‘हाय रेस्क्यू!’ वाटतं. कारण कितीही खोटं सांगण्याचा विचार करत असाल, बायको आधीच तुमच्या मनातील सत्य जाणते! सोशल मीडियावर हा पोस्टर इतका लोकप्रिय झाला आहे की नवऱ्यांमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे –“बायकोशी खोटं बोलण्याआधी एकदा डोकं चालवायचं!”या पोस्टरमुळे नुसतीच हसू येत नाही, तर संसारातील बारीकसारीक गमतीजमतींचा अनुभवही समोर येतो. हल्ली ...
रजोनिवृत्ती : स्त्रीच्या आयुष्यातील नवा टप्पा आणि बदलांचा प्रवास
Gerenal

रजोनिवृत्ती : स्त्रीच्या आयुष्यातील नवा टप्पा आणि बदलांचा प्रवास

स्त्रीचे आयुष्य म्हणजे ऋतूंचा प्रवास. बालपणापासून किशोरवय, तरुणाई, मातृत्व, आणि नंतर वृद्धत्व असा हा प्रवास असतो. या प्रत्येक टप्प्यात शरीर आणि मनामध्ये अनेक बदल होत राहतात. मासिक पाळी सुरू होणे हा जसा एका नव्या जीवनाचा प्रारंभ असतो, तसाच मासिक पाळी थांबणे म्हणजे एका वेगळ्या टप्प्याची सुरुवात असते. या टप्प्यालाच आपण रजोनिवृत्ती म्हणतो.रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या प्रजननक्षमतेचा शेवट दर्शवते. साधारणतः 45 ते 55 वयोगटात ती दिसून येते, पण काहींमध्ये ती 40 च्या आसपासही सुरू होते. जेव्हा सलग बारा महिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा या स्थितीला रजोनिवृत्ती मानले जाते. हा काळ फक्त शारीरिक बदल घडवून आणत नाही तर मानसिक आणि भावनिक बदलही घडवतो.या काळात स्त्रीला अनेक नवीन अनुभवांना सामोरे जावे लागते. सुरुवातीला मासिक पाळी अनियमित होऊ लागते. कधी दोन महिने पाळी थांबते, पुन्हा येते, तर कधी अचान...
वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?
Gerenal

वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?

वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?एक टॉवेल जास्तीत जास्त किती दिवस वापरलेला चांगला?आपण सगळेच सकाळी उठल्यावर दात घासणे, आंघोळ करणे या क्रिया करतो. काही जण तर संध्याकाळी ऑफीसमधून किंवा बाहेरुन घरी आल्यावरही पुन्हा आंघोळ करतात. आंघोळ झाली की अंग पुसण्यासाठी आपण टॉवेल वापरतो. हे टॉवेल टर्किस, कॉटन, पंचा अशा विविध कापडाचे, आकाराचे आणि रंगांचे असतात. लहान मुलांसाठी नेहमीपेक्षा थोडे सॉफ्ट टॉवेल वापरले जातात तर काही जण आवर्जून जास्त खरखरीत असणारे टॉवेल वापरतात. काही जण रोजच्या रोज हा टॉवेल धुवायला टाकतात तर काही जण २ ते ३ दिवस वापरुन टॉवेल धुतात हॉस्टेलमध्ये राहणारी किंवा बॅचलर मंडळी तर ८ दिवस एकच टॉवेल वाळवून पुन्हा पुन्हा वापरतात.आरोग्याच्या दृष्टीने हे फारसे चांगले नसते कारण त्यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. टॉवेल धुणे आणि मग वापरणे ही एक बाब झाली पण काही जण टॉवेल चांगला टिकला...
IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!
Gerenal

IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!

IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!IFSC कोड आपल्या बँकेच्या पासबुकवर छापलेला आपल्याला दिसतो परंतु तो का असतो हे तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर चला मग जाणुन घेऊ.इंटरनेट आणि संघनक ह्या मुळे बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले.  त्यात रक्कम इतर खात्यात वर्ग करण्या साठी म्हणा अथवा एका बँकेतून दुसऱ्या बॅंक खात्यात  जर पाठवायची असेल तर पूर्वी ज्या पद्धतीचा वापर होत होता. त्या वेळ खाऊ, तर होत्याच त्याच बरोबर किचकट ही होत्या. त्या पूर्णतः बदल झाला असून आता चुटकी सरशी फँड इकडून तिकडं वर्ग होऊ शकतो.आणि त्याच साठी हा IFSC कोड सर्वात महत्वाची भूमिका  बजावत असतो. तो NEFT  मध्ये काही तासात तर RTGS  व IMPS  मध्ये काही मिनिटात फँड ट्रान्सफर होतो. त्याच साठी दोन्ही ही बॅंका ना हा IFSC कोडRBI ने दिलेला असतो. तो प्रत्येक बँकेला वेगळा असतो. (शाखेलाही) ,त्या मुळे व्यवहार एकदम सुरक्षित ...
इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…
Article, Gerenal

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ…

इंग्रजांचं हिलस्टेशन आणि महाराष्ट्राची कॉटन सिटी यवतमाळ...इंग्रजांचं ‘हिलस्टेशन’ आणि यवतमाळ महाराष्ट्राच्या ‘कॉटन सिटी’ बद्दल जाणून घ्या.यवतमाळ हा “महाराष्ट्रातच असणाऱ्या सदैव दुर्लक्षित आणि मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भातील” एक जिल्हा आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून यवतमाळ १५० किमीच्या अंतरावर आहे.यवतमाळ म्हणजे डोंगरांची माळ.. जुन्या रेकॉर्डप्रमाणे यवतमाळ हे जगातलं सर्वात सुरक्षित गाव होते. पूर्वी यवती म्हणून ओळखले जाणारे हे शहर बेरार सल्तनतेचे प्रमुख शहर होते. १३४७ मध्ये ह्या भागावर अलाउद्दीन हसन बहमन शाह ह्याची राजवट होती आणि त्याने ह्या प्रदेशात बहमनी सल्तनतीची स्थापना केली.त्यानंतर १५७२ मध्ये अहमदनगर सल्तनतीच्या मुर्तझा शाहने यवतमाळ आपल्या ताब्यात घेतले. १५९६ साली अहमदनगरच्या चांद बीबीने यवतमाळ मुघल साम्राज्यात आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर म्हणजे १७०७ साली यवत...
श्री हनुमान मारूती जन्माचा इतिहास
Gerenal

श्री हनुमान मारूती जन्माचा इतिहास

राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले.हनुमान रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो रामाचा महान भक्त, दास, दूत मानला...
Gerenal

हृदयविकारामागील कारणे

जाडी असेल तर शरीर अनेक रोगांचं घर बनू शकतं असा समज असतो. हे सत्यही आहे. पण याचा अर्थ शरीरयष्टी सडपातळ असेल तर आजार आजूबाजूला फिरकत नाहीत असा होत नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे सडसडीत लोकांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, व्यायाम आणि संतुलित आहार याला पर्याय नाही हे सदैव ध्यानी ठेवा. हृदयविकाराचा झटका येण्यामागील कारणं जाणून घेऊ या.उच्च रक्तदाबाच्या रूग्णांच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढतं. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. स्थूल लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसंच कोलेस्टेरॉल यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. धूम्रपान करणार्‍यांना हृदयविकाराचा धोका असतो. वाढत्या वयात आरोग्याकडे लक्ष न दिल्याने कोलेस्टेरॉल वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये ब्लॉकेजची समस्या निर्माण होऊन हृदय...