धम्मचक्र प्रवर्तन व आम्ही !
तथागत भगवान बुद्धाद्वारे दिलेले प्रथम प्रवचन हे पाली साहित्यामध्ये 'धम्मचक्कपवत्तन सुत्त' या नावाने आम्ही पाहतो. हा उपदेश भगवान बुद्धाने प्रथमत: पंचवर्गीय भिक्खुंना दिला. 'धम्म' शब्दाचा अर्थ सत्य, सदाचरण, शिलाचरण असा होतो. मुळात मानव शांतताप्रिय आहे हे बुद्ध जाणून होते. त्यांनी पंचवर्गीय भिंक्खूना प्रथमत: वार्तालाभ करुन काही प्रश्न विचारले की, शुद्ध आचरण करणे, मानवास मानवता प्राप्त करण्यास आवश्यक नाही का? शुद्ध व्यवहाराकरिता शुद्धचित्त होणे गरजेचे नाही का? त्याकरिता पंचशिल हे काया, वाचा, मनाने पाळणे आवश्यक नाही का? यावर पंचवर्गीय भिक्खूंचे उत्तर होकारार्थी आल्यावर त्यांनी त्यांना विशुद्धी मार्गावर प्रवचन दिले. विशुद्धी मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक होय. जो शील, समाधी, प्रज्ञामध्ये विभक्त आहे. 'शील' या संकल्पनेला बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये उच्च व महत्वाचे स्थान दिले आहे. व्यक्तीचे व्यक्तीमत्...