बाबासाहेब एक चळवळ
सहा डिसेंबर १९५६ सकाळी नेहमीप्रमाणं लोकांनी वर्तमानपत्र पाहिलं.त्यात एक बातमी झळकली.अस्पृश्यांचा नेता काळाच्या पडद्याआड.खरं तर चवदार तळ्याचा जेव्हा सत्याग्रह झाला.तेव्हा ज्या ज्या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्या चवदार तळ्याच्या आंदोलनाला विरोध केला.त्या केशरी आणि मराठा या वृतिचपत्रांनीही वृत्ताची दखल घेत आपल्या पहिल्याच पानावर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी झळकवली होती.
डाँ बाबासाहेब एक झंजावातच होते.नव्हे तर एक चळवळ.त्या बाबासाहेबांनी कित्येक आंदोलनं करीत आपल्या अस्पृश्य जातींना त्या विटाळाच्या काळ्या बुरख्यातुन बाहेर काढले होते.दलितांना न्याय मिळवुन दिला होता.त्यापुर्वी कोणी त्या गोष्टींना परंपरा समजत होते तर कोणी त्याच गोष्टीला देवाची लीला......खरंच अस्पृश्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचित करणे याला देवाची लीला कसे म्हणता येईल?तरीही उच्चवर्णीयांच्या गोटातील काही मंडळी म्हणत होती ...
